वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल :‘लाईव्ह कॉन्सर्ट’ने तरुणाई बेभान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 09:50 PM2019-01-20T21:50:31+5:302019-01-20T21:51:17+5:30
‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल अंतर्गत रविवारी लक्ष्मीनगर मैदान व रेशीमबाग मैदान येथे सादर करण्यात आलेल्या ताल धरायला लावणाऱ्या गाण्यांच्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये तरुणाई बेभान होऊन नाचली. तसेच, गाणी ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल अंतर्गत रविवारी लक्ष्मीनगर मैदान व रेशीमबाग मैदान येथे सादर करण्यात आलेल्या ताल धरायला लावणाऱ्या गाण्यांच्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये तरुणाई बेभान होऊन नाचली. तसेच, गाणी ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
कॉन्सर्टमध्ये श्री एन्टरटेनर्स बॅन्डचे कलावंत मुस्तफिज अंजुम (गायक), नंदू गोहणे (डमिस्ट), विक्रांत लिमजे व वसंत भट (की-बोर्ड) यांनी ए दिल दिवाना..., के तेरे लिए दुनिया छोड दि है..., ले जाये जाने कहा हवाए..., दिल दिया गल्ला..., चन्ना मेरेया मेरेया..., जो तेरे खातीर तडपे पहले से ही..., ना तुम जानो ना हम..., तेरे नाल नचना..., टिष्ट्वस्ट कमरिया..., तम्मा तम्मा दोगे... अशा एकाहूनएक सरस गीतांचा नजराणा सादर केला. लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट सुरू होताच परिसरातील व रोडने जाणारी-येणारी तरुणाई आणि नागरिकांचे पाय तिकडे वळले. तरुणाईने गाण्यांवर ठेका धरला तर, इतरांनी श्रवणीय गाण्यांचा आनंद लुटला. एखादे गाणे आवडल्यानंतर वन्स मोअरची डिमान्ड करण्यात येत होती. कलावंतांनी शेवटपर्यंत कुणालाही निराश केले नाही. त्यांनी प्रत्येकाला आवडेल अशी गीते सादर करून सर्वांची मने जिंकली.