वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्ह : नागपुरात शहरभर संगीताची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:50 PM2019-01-19T23:50:19+5:302019-01-19T23:57:22+5:30

उपराजधानीत सुरू असलेल्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल प्रत्येक वर्गासाठी एक आगळीवेगळी पर्वणी घेऊन आला आहे. फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये लाईव्ह म्युझिक कन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रस्त्यावर युवा गायक आणि वादक कलावंतांनी एकाहून एक सरस गीतांचा नजराणा सादर केला. शहरातील रस्त्यावर सुरू असलेली संगीताची धूम बघून युवावर्गामध्येही उत्साह संचारला होता. 

World Orange Festival: Music fame across the city in Nagpur | वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्ह : नागपुरात शहरभर संगीताची धूम

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्ह : नागपुरात शहरभर संगीताची धूम

Next
ठळक मुद्देगायक कलावंतांकडून उत्स्फू र्त गीतांचा नजराणा : युवकांनी दाखविला उत्साह विद्यापीठ मैदान, वर्धमाननगर, चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कसह फुटाळा चौपाटीवर आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत सुरू असलेल्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल प्रत्येक वर्गासाठी एक आगळीवेगळी पर्वणी घेऊन आला आहे. फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये लाईव्ह म्युझिक कन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रस्त्यावर युवा गायक आणि वादक कलावंतांनी एकाहून एक सरस गीतांचा नजराणा सादर केला. शहरातील रस्त्यावर सुरू असलेली संगीताची धूम बघून युवावर्गामध्येही उत्साह संचारला होता. 


शहरातील अमरावती रोडवरील विद्यापीठाचे मैदान, वर्धमाननगर परिसरातील पूनम बाजार, चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क व फुटाळा चौपाटीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलनिमित्त तयार करण्यात आलेल्या ट्रकवर म्युझिक सिस्टम आणि वाद्यासोबत गायक आणि वादकांनी आकर्षक गीतांचा नजराणा सादर केला. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी आपली वाहने थांबवून कार्यक्रमाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे युवकांमध्ये या लाईव्ह कन्सर्टचा चांगलाच उत्साह दिसून आला. विद्यापीठाच्या मैदानावर व फुटाळा चौपाटीवर गायक शादाब यांच्यासह ऑक्टोपॅडवादक नंदू गोहाणे, की-बोर्डवर विक्की निमजे यांनी आपल्या गीतांनी परिसराचा माहोल संगीतमय बनविला. यात शादाबने ‘हम तेरे बिन अब रह नहीं सकते...’ ‘चंदा मेरे आ मेरे आ...’ या गीतांसह प्रचलित गीतांबरोबरच काही जुन्या गीतांचेही सादरीकरण केले. कलावंतांकडून होत असलेल्या गीतांच्या सादरीकरणावर युवकांनीही चांगलाच ठेका धरला. फुटाळा तलावावर झालेल्या लाईव्ह कन्सर्टमध्ये युवक-युवतींनी गर्दी केली होती. 

 वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलबाबत युवकांमध्ये कुतूहल
वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलची शहरभर धूम सुरू आहे. कुठे प्रबोधनाचे कार्यक्रम होत असून, कुठे मनोरंजनात्मक कार्यक्रम सुरू आहे. लाईव्ह म्युझिक कन्सर्टमुळे फेस्टिव्हलच्या आयोजनात चांगलीच रंगत आली. कार्यक्रमाच्या स्थळावर आयोजकांनी फेस्टिव्हलसंदर्भात विचारणा केली. संत्र्याच्या थीमवर सुरू असलेले हे रंगतदार आयोजनाचे युवकांनी कौतुक केले.

Web Title: World Orange Festival: Music fame across the city in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.