जागतिक महिला दिन; उपराजधानीत नारीशक्तीला सलाम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:45 AM2020-03-09T11:45:35+5:302020-03-09T11:46:14+5:30
स्त्रीशक्तीचा सन्मान अधोरेखित करणारा जागतिक महिला दिन रविवारी संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपराजधानीतही नारीशक्तीचा गौरवपूर्ण गजर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्त्रीशक्तीचा सन्मान अधोरेखित करणारा जागतिक महिला दिन रविवारी संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपराजधानीतही नारीशक्तीचा गौरवपूर्ण गजर करण्यात आला. शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था-संघटना, शासकीय, खासगी संस्थांमध्येही ममता व मातृत्वाचे प्रतीक असलेल्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नारीशक्तींचा गुणगौरव करण्यात आला. कुठे सत्कार तर कुठे व्याख्यान कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांची महती गायली गेली. यानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
समाजभान जपत पत्रकारिता करणाºया नागपुरातील महिला पत्रकारांचा महिला दिनी नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये झालेल्या या समारंभात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहायक संचालक शैलेजा वाघ-दांदळे, वरिष्ठ उपसंपादक रंजू मिश्रा, पत्रकार सोनाली ठेंगडी, मनका बहल आणि उपसंपादक फरिना सरीन कुरैशी यांना सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे, पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या समारंभाप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, ब्रह्माशंकर त्रिपाठी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
समता सैनिक दल
समता सैनिक दलाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भंते नागदीपंकर व दलाच्या महिला अधिकारी निशा रामटेके यांच्या अध्यक्षतेत दलाचे राष्टÑीय जीओसी प्रदीप डोंगरे, प्रशिक्षण प्रमुख खुशाल लाडे, निशा डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. संचालन राजकुमार वंजारी यांनी केले. आयोजनात प्रा. गोवर्धन वानखेडे, सुनिता गेडाम, सुचिता लोखंडे, कमला ढोक, शकुंतला पिल्लेवान, दुर्गा पिल्लेवान, बिंदू मानके, रत्नमाला लोखंडे, करुण कोल्हे, छाया पाटील, नीता पाटील, आकाश मोटघरे, अरविंद नंदेश्वर, राहुल गेडाम, रमेश ढवळे, फुलचंद गजभिये, सुरेंद्र चव्हाण, बी.एम. बागडे, गौतम फुलझेले आदींचा सहभाग होता.
बहुउद्देशीय शिक्षण व प्रशिक्षण संस्था
बहुउद्देशीय शिक्षण व प्रशिक्षण समाज विकास संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी छाया बढे, बजाजनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर, विकास मेंढे, रवी कर्जाते, संस्थेच्या मंदा वैरागडे प्रामुख्याने उपस्थित होते. आयोजनात उषा जवादे, नीलिमा पौनीकर, मेघा साठवणे, सुरेखा कुटे, शोभा पांडे, अमिता तिवारी, नीता जैस्वाल, स्नेहल बिडवई, छाया मुजुमदार, मंदा भाके, अविनाश माटे आदींचा सहभाग होता.
शहर विकास मंच
शांतिनगर येथे महिला क्रांतिकारी बचत गट सहकारी संस्था, युवा अर्बन व शहर विकास मंचच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रेहाना बेगम यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात मंचचे संयोजक अनिल वासनिक, युवा अर्बनचे नितीन मेश्राम, विमल बुलबुले, अंजली आंबुलकर, अहिल्या नागदिवे, विमल येसने, प्रभा अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते. रंजना भगत, सीमा रामटेके यांनी मनोगत मांडले. संचालन नितीन मेश्राम यांनी केले तर उर्मिला बडगे यांनी आभार मानले. आयोजनात मालती भुते, रंजना वारीवाले, मृणालिनी खोब्रागडे, मीना निमजे, शकुन रामटेके, बेबी सिंगनजुडे, कल्पना बारापात्रे, प्रमिला वारीवाले, राणू निनावे आदींचा सहभाग होता.