नागपुरात जागतिक योगदिनाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 07:45 PM2019-06-13T19:45:52+5:302019-06-13T19:46:31+5:30
येत्या २१ जून रोजी जगभरात विश्व योगदिन साजरा केला जाणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या २१ जून रोजी जगभरात विश्व योगदिन साजरा केला जाणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. योगदिनाच्या दिवशी सामूहिक योग कार्यक्रमात प्रशिक्षित योगसाधकांनी सहभागी व्हावे, हा उद्देश ठेवून मंडळाने प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे. नुकतेच चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क, धरमपेठ येथे सामूहिक योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने योगसाधक सहभागी झाले होते. याशिवाय मंडळाच्या रामनगर येथील परिसरात दररोज सकाळी ७ ते ८ व ८ ते ९ आणि सायंकाळी ७ ते ८ दरम्यान योग प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत असून यामध्येही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही योग दिनाच्या दिवशी महापालिकेच्यावतीने यशवंत स्टेडियम येथे भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या कार्यक्रमात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाकडून ४० हजार योगसाधक सहभागी होतील, असा विश्वास मंडळातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.