चिंताजनक! २७१८ बाधित,४५ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:09 AM2021-04-23T04:09:43+5:302021-04-23T04:09:43+5:30
काटोल/ कळमेश्वर/ उमरेड/ कुही/ रामटेक/ मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. गुरुवारी जिल्ह्यातील १३ ...
काटोल/ कळमेश्वर/ उमरेड/ कुही/ रामटेक/ मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. गुरुवारी जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला; तर २७१८ नवीन रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात आतापर्यंत १५९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या ९०,६४८ झाली आहे. गुरुवारी २४६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे ही संख्या आता ६१,५२० झाली आहे. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २८,०१० इतकी झाली आहे.
रामटेक तालुक्यात १३७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ३६, तर ग्रामीण भागातील १०१ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४६६५ झाली आहे. यातील २५२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २१३४ झाली आहे.
कळमेश्वर तालुक्यात १८१ रुग्णांची भर पडली. यातील कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील २६, तर ग्रामीण भागात १५५ रुग्णांचा समावेश आहे. काटोल तालुक्यात १५५ रुग्णांची नोंद झाली. यात काटोल शहरातील ४८, तर ग्रामीण भागातील १०७ रुग्णांचा समावेश आहे.
कुही तालुक्यातील विविध केंद्रांवर ५९६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ९७ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात कुही येथील २०, मांढळ (१७), वेलतूर (२८), साळवा (७) तर तितूर येथे २५ रुग्णांची नोंद करण्यात आली. दोन रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३०४९ झाली आहे.
हिंगणा तालुक्यात १८४ रुग्ण
हिंगणा तालुक्यात गुरुवारी ११३६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १८४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तालुक्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे येथील मृत्युसंख्या १८७ झाली आहे. वानाडोंगरी येथे ७३, डिगडोह (१८), निलडोह (१५), रायपूर (१४), इसासनी (१२), कान्होलीबारा (११), मोंढा (८), टाकळघाट (४), सुकळी कलार, उमरी वाघ, खैरी व हिंगणा येथे प्रत्येकी ३, माथनी व मांडव घोराड येथे प्रत्येकी २, कवडस, अडेगाव, देवळी काळबांडे, डेगमा खुर्द, गिदमगड, सावंगी, देवळी, सुकळी घारापुरी, भारकस, आमगाव, किन्ही धानोली, बोरगाव व वडधामना येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या तालुक्यातील बाधितांची संख्या ९५५४ झाली आहे. यातील ५९०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.