औषध विक्रीतून साधतात त्या मानवतेची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 02:29 AM2020-05-08T02:29:29+5:302020-05-08T02:30:57+5:30

त्रिमूर्ती नगरातील आदर्श कॉलनीमध्ये राहणाऱ्या पूजा धकाते मागील १३ वर्षांपासून त्रिमूर्ती नगरातील सचिन मेडिकलमध्ये औषध विक्रीसाठी सहायक म्हणून काम करतात. घरात दोन मुले आणि पती व सासू-सासरे असा प्रपंच सांभाळून त्या या कोरोनाच्या काळातही मानवतेची ‘पूजा’ करीत आहेत.

Worship the humanity that comes from selling drugs | औषध विक्रीतून साधतात त्या मानवतेची पूजा

औषध विक्रीतून साधतात त्या मानवतेची पूजा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्रिमूर्ती नगरातील आदर्श कॉलनीमध्ये राहणाऱ्या पूजा धकाते मागील १३ वर्षांपासून त्रिमूर्ती नगरातील सचिन मेडिकलमध्ये औषध विक्रीसाठी सहायक म्हणून काम करतात. घरात दोन मुले आणि पती व सासू-सासरे असा प्रपंच सांभाळून त्या या कोरोनाच्या काळातही मानवतेची ‘पूजा’ करीत आहेत.
या कोरोनाच्या दिवसात सारेच घरात थांबून असलेले. सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमधील उपस्थितीही सरकारने कमी केलेली आहे. आरोग्यसेवा मात्र अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने पूजा धकाते यांना घरी थांबणे अशक्यच. घरात एक आठ वर्षांचा व त्याहून एक मोठा अशी दोन मुले असतानाही ही ‘वॉरिअर मदर’ मुलांना सुरक्षितपणे घरात ठेवून आज कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये मैदानात उतरली आहे. मेडिकलमध्ये येणारे ग्राहक आधीच दु:खीकष्टी असतात. कुणाचे नातेवाईक अंथरुणाला खिळलेले तर कुणाची शस्त्रक्रिया अडलेली. एवढेच नाही, कुणी स्वत:च रुग्ण असतात. त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी एका योद्ध्याच्या रूपात उभी ठाकलेली ही माउली केवळ सॅनिटायझर आणि मास्क या शस्त्रांनिशी लढताना पाहून कौतुक वाटल्याखेरीज राहत नाही.

‘लोकमत’शी बोलताना पूजा धकाते म्हणाल्या, पूर्ण सुरक्षा बाळगून असल्याने कोरोनाची भीती वाटत नाही. आपल्या मुलांना आणि पतीलाही याबद्दल भीती नाही. स्वयंसुरक्षा आणि स्वच्छता हेच यावर शस्त्र आहे, हे त्यांना पटले आहे. सकाळी ८ वाजता त्या मेडिकल शॉपला येतात. सायंकाळी ४ वाजेपर्यंत काम करून नंतर घरी परततात. गेल्यावर स्वत:ला पूर्ण सॅनिटाईज करून आणि पर्स, बॅग हे साहित्य बाहेर ठेवूनच त्या कामाला लागतात. मेडिकल शॉपमध्ये असले तरी मुलांची थोडी चिंता वाटते. मात्र मुले शहाण्यासारखी वागतात. ती कामात मदत करतात, पतींचेही आणि सासू-सासऱ्यांचेही सहकार्य मिळते. घरातून मिळालेला हा आधार आणि मानसिक पाठबळ दुसºया दिवशी कोरोनाविरुद्ध लढण्याचे बळ देऊन जातो. त्यांचे पती कापडाच्या शोरूममध्ये काम करतात. लॉकडाऊनमुळे ते बंदच असल्याने कुटुंबाची जबाबदारी आपण सांभाळतोय, याचाही त्यांना आनंद आहे. कुटुंबालाही पूजाचा अभिमान आहे.
त्या म्हणतात, या कामात समाधान आहे. आजाºयांची सेवा करण्यासारखे दुसरे मोठे समाधान नाही. या कामातून ते मी मिळविते. अन्य महिलाही घरातल्या घरात राहून वृद्ध, महिला यांना मदत करूनही सेवा करू शकतात. यातून कोरोनावर आम्ही सारेच मात करू शकतो.

Web Title: Worship the humanity that comes from selling drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.