नागपुरात कुस्ती प्रशिक्षकाचा विद्यार्थीनीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:34 PM2018-05-11T15:34:12+5:302018-05-11T15:34:23+5:30
मालिश करण्याच्या बहाण्याने घरी नेऊन कुस्तीच्या एका प्रशिक्षकाने विद्यार्थीनीवर (वय १८) बलात्कार केला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. गुरुवारी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालिश करण्याच्या बहाण्याने घरी नेऊन कुस्तीच्या एका प्रशिक्षकाने विद्यार्थीनीवर (वय १८) बलात्कार केला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. गुरुवारी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
अजय मलिक (वय २२) असे आरोपीचे नाव आहे. तो ओमनगरातील नागमंदीराजवळ राहतो. सक्करद-यातील एका शाळेत विविध प्रकारच्या खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर सुरू आहे. पीडित विद्यार्थीनी दोन आठवड्यांपूर्वी या शिबीरात कुस्तीचे प्रशिण घेण्यासाठी सहभागी झाली होती. आरोपी अजय मलिक हा तेथे मुलींना कुस्तीचे धडे देत होता. त्याची आधीपासूनच पीडित मुलीवर नजर होती. त्यामुळे त्याने मुलीला कुस्ती शिकण्यासोबत शरिराची मालिश करता येणेही आवश्यक असल्याचे सांगितले होते. मालिश शिवाय शरिर दणकट होत नाही आणि शरिर दणकट असल्याशिवाय कुस्तीगीर टिकत नाही, असे तो विद्यार्थ्यांना सांगायचा. त्याने पीडित मुलीलाही मालिश करण्याचा आणि शिकून घेण्याचा हट्ट धरला होता. गुरुवारी सकाळी पीडित मुलीने प्रॅक्टीस केल्यानंतर ७ वाजता तिने नकार देऊनही तो तिला जबरदस्तीने आपल्या घरी मालिश करण्यासाठी घेऊन गेला. एका रुममध्ये नेल्यावर त्याने तिला थेट कपडे काढण्यास सांगितले. तिने नकार दिला. यावेळी त्याने तिला बाध्य केले आणि मालिश करण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला.
पीडित मुलीने घरी आल्यानंतर आपल्या पालकांना हा गैरप्रकार सांगितला. पालकांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार सांदिपान पवार यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने लगेच गुन्हा दाखल करू घेत आरोपीला अटक केली.
पतीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा
कोराडी पोलीस ठाण्यात महादुल्यात राहणा-या एका महिलेने (वय ३८) तिच्या पती (वय ४४) विरुद्ध अनैसर्गिक अत्याचाराची तक्रार नोंदवली. आरोपी नेहमी तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत अनैसर्गिक शारिरिक संबंध प्रस्थापित करतो. बुधवारी आणि गुरुवारीदेखिल त्याने असाच प्रयत्न केला. तो असह्य झाल्याने महिलेने आरोपीविरुद्ध कलम ३७७, ५११,५०६ गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी केली जात आहे.