प.सं. सभापतीचा प्रभार कुणाकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:09 AM2021-03-25T04:09:01+5:302021-03-25T04:09:01+5:30
रामटेक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नागपूर जिल्हा परिषद आणि विविध पंचायत समित्यात ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्या उमेदवारांचे सदस्यत्व रद्द ...
रामटेक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नागपूर जिल्हा परिषद आणि विविध पंचायत समित्यात ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्या उमेदवारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यानुसार रामटेक पंचायत समितीच्या सभापती कला ठाकरे यांचेही सदस्यत्व रद्द झाले आहे. यानंतर त्या सभापती पदावरून पदमुक्तही झाल्या. मात्र त्यांचा सभापतिपदाचा प्रभार अद्यापही कुणाकडे सोपविण्यात आलेला नाही. यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने स्पष्ट आदेश नसल्याने रामटेक पंचायत समितीचा कारभार गत २० दिवसापासून सभापतिविनाच सुरू आहे. रामटेक पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र कुमरे आहेत. मात्र त्यांनाही सभापतिपदाचा प्रभार स्वीकारण्याबाबत प्रशासनाचे कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही.
--
ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्या पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने, रामटेक पंचायत समितीच्या सभापती कला ठाकरे यांचे पद रिक्त झाले आहे. सभापतिपदाचा कारभार स्वीकारण्याबाबत मला कोणताही अधिकृत आदेश नाही. सभापतीचे पद रिक्त असल्याने नागरिकांची कामे अडू नयेत, यासाठी मी कार्यरत आहे.
रवींद्र कुमरे, उपसभापती, पं.स. रामटेक