काेराडी येथे याेगदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:06 AM2021-06-22T04:06:48+5:302021-06-22T04:06:48+5:30

काेराडी : तायवाडे महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, आयक्यूएसी विभाग, प्रियदर्शनी महिला महाविद्यालय वर्धा, डी. बी. सायन्स ...

Yagdin at Karadi | काेराडी येथे याेगदिन

काेराडी येथे याेगदिन

Next

काेराडी : तायवाडे महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, आयक्यूएसी विभाग, प्रियदर्शनी महिला महाविद्यालय वर्धा, डी. बी. सायन्स कॉलेज गोंदिया, एन. पी. डब्ल्यू. महाविद्यालय गाडेगाव-लाखनी व राजकुमार तिडके महाविद्यालय मौदा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भूषण टाके व मनोज शिर्के यांनी प्रात्याक्षिक दाखवून उपस्‍थित साधकांकडून योगा व प्राणायामाचा अभ्यास करवून घेतला. यावेळी प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे, प्राचार्य रंभा सोनाये, प्राचार्य डी. बी. कडव, प्राचार्य डॉ. अभय भक्ते, प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांनी सहभाग नाेंदविला. ऑनलाईन पद्धतीने या योगदिनाचे आयाेजन केले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोनाली शिरभाते यांनी केले. संचालन डॉ. अमित टेंभुर्णे व पाहुण्यांचा परिचय डॉ. सुधीर सहारे यांनी तर आभार डॉ. हरीश मोहिते यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयाेजनासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनील भोतमांगे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर घोरमाडे यांनी सहकार्य केले.

....

पतंजली याेग समिती माेवाड

मोवाड : पतंजली याेग समितीच्या वतीने याेगदिनानिमित्त ऑनलाईन याेग शिबिर घेण्यात आले. ‘करा याेग, रहा निराेग’ या विचाराला धरून नागरिकांनी याेगासने केली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक महेश बोथले उपस्थित हाेते. त्यांनी योगासने कोरोना काळात रोगमुक्त व तणावमुक्त जीवन जगण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. यावेळी पुरुषोत्तम थोटे, सुरेश पांढरकर, योग शिक्षक तेजश्री बनाईत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत मालधुरे यांनी तर आकाश गाखरे यांनी आभार मानले. यावेळी योग शिक्षक लखन कळंबे, विवेक बालपांडे व साधक उपस्थित होते.

....

उपजिल्हा रुग्णालय कामठी

कामठी : योगाभ्यासाच्या माध्यमातून शिक्षित, सुसंस्कृत व स्वस्थ नागरिक घडविण्यास तसेच योगाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत व्हावी, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त कामठी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने सामूहिक योगसाधना घेऊन योगदिन साजरा करण्यात आला. योग शिक्षक एस. झेड. हैदर यांनी योग केल्याने शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास होत असून, कोरोना आजाराविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आदीपासून मुक्तता मिळत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा भाजीपाले, डॉ. स्वाती, डॉ. शबाह हाफिज अन्सारी, डॉ. अली, डॉ. गीता, डॉ. विनोद, डॉ. पूर्वाली, डॉ. तेजस्विनी गेडाम, डॉ. रुबीना, पानसरे, वनिता चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा कडू यांनी तर कविता शंभरकर यांनी आभार मानले.

Web Title: Yagdin at Karadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.