यशवंत मनोहर यांना ‘कविवर्य कुसुमाग्रज’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:08 PM2018-02-16T13:08:57+5:302018-02-16T13:09:47+5:30
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे (मसाप) देण्यात येणारा कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादिनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे (मसाप) देण्यात येणारा कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादिनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. ११ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. याआधी हा पुरस्कार विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, नाराणय सुर्वे, अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ यांना मिळाला आहे. डॉ. यशवंत मनोहर यांचे आजवर उत्थानगुंफा, मूर्तिभंजन, जीवनायन असे १० कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांना महाराष्ट्र शासनाचा केसवसूत काव्य पुरस्कार, उत्थानगुंफाला शासनाचा उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार मिळाला आहे.