काेलारी येथील यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:24+5:302021-02-05T04:38:24+5:30
भिवापूर : विदर्भातील भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्या काेलारी येथील श्री समर्थ एकनाथ महाराज पालखी महाेत्सव यात्रा यंदा रद्द करण्यात आली ...
भिवापूर : विदर्भातील भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्या काेलारी येथील श्री समर्थ एकनाथ महाराज पालखी महाेत्सव यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. काेराेना पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. भिवापूर येथून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या काेलारी (साठगाव) येथे दरवर्षी श्री समर्थ एकनाथ महाराज पुण्यतिथी महाेत्सवानिमित्त तीनदिवसीय यात्रा भरते. याठिकाणी तांडापेठ नागपूर येथील स्व. काशीबाई चिचघरे यांच्या निवासस्थानाहून ‘श्री’ची पालखी सहभागी हाेते. यात्रेत नागपूरसह इतर जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक भाविक सहभागी हाेतात. परंतु यावर्षी काेराेनामुळे गर्दी टाळण्यासाठी, उपाययाेजना म्हणून देवस्थान समितीने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ते ९ फेब्रुवारीला माेजक्या मंडळींच्या उपस्थितीत साधेपणाने पूजा-अर्चा करण्यात येईल. महाप्रसाद कार्यक्रम व यात्रा यंदा रद्द करण्यात आली असून, भाविकांनी याची नाेंद घ्यावी, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.