यवतमाळ नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By admin | Published: May 23, 2017 01:29 PM2017-05-23T13:29:08+5:302017-05-23T13:29:08+5:30
यवतमाळ नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारले.
Next
यवतमाळ: शिवसेना नगरसेविकेच्या पतीने तोडफोड केल्याच्या निषेधार्थ यवतमाळ नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारले.
गेल्या एक महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा न केल्याच्या संतापात या पतीने नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात जाऊन तोडफोड केली. तेथील संगणक उचलून फेकले व कागदपत्रांची नासधूस केली.
याप्रकरणी फौजदारी तक्रारीसाठी अभियंत्यावर भाजपाचा दबाव येत असून दुसरीकडे शिवसेना नगराध्यक्षांचा तडजोडीचा प्रयत्न सुरू असल्याचे कळते.