परदेशात शिक्षणासाठी यंदा विभागातील २३ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:12 AM2021-08-24T04:12:09+5:302021-08-24T04:12:09+5:30
नागपूर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना दरवर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ...
नागपूर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना दरवर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशात शिक्षणासाठी पाठविले जाते. राज्यातील एकूण ७५ विद्यार्थ्यांमध्ये यंदा नागपूर विभागातील २३ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे, हे विशेष.
या विद्यार्थ्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील अंकित नरेंद्र रामटेके, अक्षय विजय बागडे, असंग राहुल वानखेडे, उपेंद्र पुनाराम सोनपिंपळे, ओशिन सुरेंद्र पझारे, ज्योतीराम कैलास वानखेडे, तन्वी राजहंस शेंडे, नभश्री निकेतन जांभूळकर, नयन गोविंदा मेश्राम, प्रशांत मच्छिंद्र पौनीपगार, राहुल धारेंद्र चौरे, विकास राजेंद्र बागडे, शरयू दिलीप पझारे, शीतल पंडित मेश्राम, सम्यक कबीर रवळेकर, स्वप्निल राजेश लिंगायत यांचा समावेश आहे. तर भंडारा जिल्ह्यातील प्रशिकदिव्य प्रभुदासजी गजभिये, शिवानी गंगाधर वालदेकर, शुभांगी जयंत खोब्रागडे, श्रेयस श्रीधर गोंडाणे या चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील एक नवोदय यादोराव बोरकर तर चंद्रपूर जिल्ह्यातील श्रेयस शैलेशकुमार देठे, हर्षाली प्रभाकर नगराळे या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
जगातील नामवंत विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी कोणतीही अडचण भासू नये, त्यांना वेळेत परदेशात जाता यावे, त्यांच्या शिक्षणात कुठलीही बाधा येऊ नये, यासाठी विभागाने गतिमान पद्धतीने यावर्षी शिष्यवृत्ती मंजूर केलेली आहे. असे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कळविले आहे.