यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव कमी
By admin | Published: March 3, 2015 02:09 AM2015-03-03T02:09:32+5:302015-03-03T02:09:32+5:30
गेल्या वर्षी मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव राहिल्यामुळे पाऊस कमी पडला आणि देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.
नागपूर : शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी भाजपाचे विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी सोमवारी संबंधित निवडणूक याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मल्लिकार्जुन रेड्डी व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून ६ एप्रिलपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. ५ मेपासून प्रकरणातील मुद्यांवर सुनावणी करण्यात येणार असून तत्पूर्वी याचिकाकर्ता व प्रतिवादींना आवश्यक दस्तावेज न्यायालयात दाखल करायचे आहेत.
खुल्या प्रवर्गासाठी राखीव रामटेक मतदारसंघात रेड्डी यांनी प्रथम तर, जयस्वाल यांनी द्वितीय क्रमांकाची मते मिळविली आहेत. जयस्वाल यांनी निवडणुकीपूर्वी रेड्डी यांच्या नामनिर्देशनपत्रावर आक्षेप घेतला होता. मल्लिकार्जुन रेड्डी हे रेड्डी ब्रदर्स अॅन्ड कंपनीचे भागीदार असून कंपनीने त्यांच्या नावावर मुखत्यारपत्र करून दिले आहे. या आधारावर ते स्वत: निविदा भरतात व पैशांचा व्यवहार करतात. शासकीय कंत्राटदार असल्यामुळे ते निवडणूक लढण्यास अपात्र आहेत असा दावा जयस्वाल यांनी केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ३० सप्टेंबर रोजी या वादावर निर्णय देताना रेड्डी यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकार केले. यानंतर १५ आॅक्टोबर २०१४ रोजी निवडणूक झाली.
जयस्वाल यांनी निवडणूक याचिकेसोबत निवडणुकीनंतरची दोन पत्रे जोडली आहेत. पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवनीचे उपविभागीय अभियंत्यांच्या ३१ आॅक्टोबर २०१४ रोजीच्या पत्रानुसार रेड्डी यांचे एक कंत्राट निवडणुकीनंतरही सुरू होते. तसेच, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांच्या पत्रानुसार २५ नोव्हेंबर २०१४ पर्यंत रेड्डी हे शासनाच्या रेकॉर्डमध्ये कंपनीचे भागीदार होते व शासनाची कामे करीत होते. यामुळे राज्यघटनेच्या आर्टिकल १९१ (१)(ई) व लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ९(ए) व १०० अनुसार रेड्डी हे निवडणूक लढविण्यास अपात्र आहेत असे जयस्वाल यांचे म्हणणे आहे. या सर्व बाबी लक्षात घेता रेड्डी यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा वादग्रस्त निर्णय रद्द करण्यात यावा, रेड्डी यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरविण्यात यावे व त्यांची निवडणूक रद्द करून द्वितीय क्रमांकाची मते घेणाऱ्या याचिकाकर्त्याला विजयी घोषित करण्यात यावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकेत निवडणूक निर्णय अधिकारी व अन्य १२ उमेदवारांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. मोहित खजांची यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)