दीक्षाभूमीबाहेर यंदा स्टॉलला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 01:21 AM2017-09-14T01:21:46+5:302017-09-14T01:22:06+5:30
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यानिमित्त देश-विदेशातून दीक्षाभूमीवर येणाºया लाखो अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून शेकडो सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यानिमित्त देश-विदेशातून दीक्षाभूमीवर येणाºया लाखो अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून शेकडो सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असतात. दीक्षाभूमीच्या भोवताल लहान-मोठे स्टॉल लावून अनुयायांना सेवा दिली जाते. यावर्षी मात्र हे चित्र दिसणार नाही. सेवाभावी संस्थांचे स्टॉल लावण्यास यावर्षी मनाई करण्यात आली आहे. यामुळे अशा संस्थांमध्ये असंतोष पसरला आहे.
गेल्या ५० वर्षांपासून दीक्षाभूमीच्या बाह्य परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक, शासकीय तसेच वैद्यकीय संस्था, संघटनांमार्फत स्टॉल लावून सेवाकार्य केले जाते. यामध्ये फुले, शाहू, आंबेडकरी आणि बौद्ध साहित्य विक्रीच्या स्टॉलसह वैद्यकीय सुविधा पुरविणारे, शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन करणाºया संस्थांमार्फत स्टॉल लावले जातात. याशिवाय खेड्यापाड्यातून येणाºया अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून या संस्था पाणीवाटप, भोजनदान यासह अनेक प्रकारच्या सेवासुविधा उपलब्ध करतात. कृ षी महाविद्यालय वसतिगृह ते चोखामेळा वसतिगृह आणि आयटीआय कॉलेजपर्यंतच्या परिसरात २०० च्यावर स्टॉल दरवर्षी लागतात. यावर्षी मात्र महानगरपालिका व पोलीस प्रशासनातर्फे सुरक्षेच्या कारणाने स्टॉल लावण्यास परवानगी नाकारल्या गेली आहे. दीक्षाभूमीच्या आंतर भागातही यावेळी केवळ बौद्ध साहित्य विक्रीच्या स्टॉल्सना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सेवाभावी संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अ.भा. धम्मसेनेचे शहर अध्यक्ष रवी शेंडे हेही संघटनेमार्फत दरवर्षी या परिसरात स्टॉल लावून अनुयायांसाठी सेवाकार्य करीत असतात. यावर्षी त्यांना परवानगी देण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस आणि मनपा प्रशासनातर्फे यासाठी वेगवेगळी कारणे दिली जात असल्याचे लोकमतशी बोलताना ते म्हणाले. मनपा व पोलीस विभागाच्या नकारानंतर शेंडे यांनी स्मारक समितीकडे धाव घेतली. मात्र त्यांनीही न्यायालयाचा तसा आदेशच असल्याचे सांगत, काही करण्यास नकार दिल्याचे रवी शेंडे यांनी सांगितले. १९५६ पासून होणाºया धम्मदीक्षा सोहळ्यास लाखो लोक दीक्षाभूमीवर येतात. आंबेडकरी संघटना व सेवाभावी संस्थेनी इतक्या वर्षांपासून लाखो अनुयायांच्या सोयीसुविधांची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. आता मात्र स्टॉलला परवानगी नाकारल्याने या अनुयायांची गैरसोय होणार आहे. त्यांना मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी शासन किंवा महापालिका पार पाडेल काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. लाखो अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी स्मारक समितीने विविध संघटनांना सोबत घेऊन हा अनुचित निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दीक्षाभूमीवर होणारा धम्मदीक्षा समारंभ हा काही उत्सव किंवा मेळावा नाही. हा समारंभ म्हणजे डॉ. बाबासाहेबांच्या लाखो अनुयायांसाठी प्रेरणेचा क्षण आहे. याकडे धार्मिक मेळावा म्हणून पाहू नका. हे देशविदेशात तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचविण्याचे केंद्र व कार्य आहे. त्यामुळे आमच्या या स्टॉलमुळे सुरक्षेत कुठलीही अडचण होणार नाही याची हमी आम्ही देतो. यासाठी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले जाईल.
- रवी शेंडे, शहराध्यक्ष, अ.भा. धम्मसेना
न्यायालयाच्या आदेशानुसार उत्सव किंवा मेळाव्यादरम्यान फुटपाथवर स्टॉल किंवा दुकान लावण्यास मनाई केली आहे. या आदेशानुसार स्मारक समितीचा नाईलाज आहे. दीक्षाभूमीच्या आंतरपरिसरातही केवळ पुस्तकांच्या विक्रीचे स्टॉल लावण्याची परवानगी दिली आहे. मात्र बाह्य परिसरात भोजनदान करणाºया सेवाभावी संस्थांसाठी फूडझोन उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही करीत आहोत.
- विलास गजघाटे,
सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती