येल्लाे माेझॅक, खाेडकिडीमुळे साेयाबीन उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:12 AM2021-08-24T04:12:52+5:302021-08-24T04:12:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : तालुक्यातील साेयाबीनच्या पिकावर फलधारणेच्या काळात खाेडमाशी व येल्लाे माेझॅकचा प्रादुर्भाव झाल्याने बहुतांश पीक उद्ध्वस्त ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातील साेयाबीनच्या पिकावर फलधारणेच्या काळात खाेडमाशी व येल्लाे माेझॅकचा प्रादुर्भाव झाल्याने बहुतांश पीक उद्ध्वस्त हाेण्याच्या मार्गावर आहे. उत्पादनात प्रचंड घट हाेणार असल्याने शेतकरी चिंतित आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कीड व राेगाचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांची पाहणीही केली आहे.
कुही तालुक्यात मागील वर्षी १५ हजार हेक्टर तर यावर्षी १८ हजार हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. गुलाबी बाेेंडअळीमुळे कपाशीचे माेठे नुकसान हाेत असून, उत्पादन खर्च वाढत असल्याने शेतकरी कपाशीच्या तुलनेत साेयाबीनला प्राधान्य देतात. यावर्षी काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवली हाेती.
पावसाची अनियमितता आणि प्रतिकूल वातावरणामुळे कुही तालुक्यातील भटरा, पांडेगाव, लोहारा, डोडमा, लांजाळा यासह अन्य शिवारातील साेयाबीनच्या पिकावर विषाणूजन्य येल्लाे माेझॅकचा प्रादुर्भाव झाला आहे. यासह काही शिवारातील साेयाबीनवर खाेडमाशीचाही प्रादुर्भाव झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असून, कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे. हा काळ फूल व फलधारणेचा असल्याने याच काळात राेग व किडीचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने साेयाबीनचे उत्पादन ९० टक्क्यांपर्यंत घटणार असल्याने तज्ज्ञांनी सांगितले.
कृषी अधिकारी पी. के. नागरकोचे, मंडळ कृषी अधिकारी कावेरी बागुल, प्रमोद घरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बालू ठवकर, कृषी पर्यवेक्षक आर. बी. सोरते, कृषी सहायक व्ही. पी. पवार, सरपंच जितू ठवकर यांनी भटारा व लाेहारा शिवारातील राेग व कीडग्रस्त साेयाबीनच्या पिकाची पाहणी केली.
...
नुकसान भरपाई द्या
नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी तहसीलदार बाबाराव तीनघसे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून याेग्य नुकसान भरपाई देण्याची मागणीही निवेदनाद्वारे केली. शिष्टमंडळात प्रमोद घरडे, बालू ठवकर, रवींद्र नाईक, महेंद्र लुटे, संजय पंचबुद्धे, दिनेश लांजेवार, ईश्वर भारती, चंदू वैद्य, राहुल थोटे, अविनाश चकोले, शिवदास भोयर, पृथ्वीराज रामटेके, संतोष लोंदासे, प्रवीण चकोले, प्रदीप भोयर, संतोष लोंदासे, ज्ञानेश्वर गजभिये, रोशन भोयर, नरेंद्र बोरकर, पुरुषोत्तम डोईजड आदी शेतकऱ्यांचा समावेश हाेता.