सोमवारपर्यंत यलो अलर्ट; मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 02:52 PM2023-07-27T14:52:28+5:302023-07-27T14:54:01+5:30

वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक असून चुकून सुद्धा झाडा खाली उभे राहू नये. 

Yellow rain alert until Monday; Heavy rain, gale with lightning is forecast in Nagpur | सोमवारपर्यंत यलो अलर्ट; मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज

सोमवारपर्यंत यलो अलर्ट; मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज

googlenewsNext

आनंद डेकाटे 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये २७ ते ३१ जुलै दरम्यान वादळवारा, वीज व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून या कालावधी करिता येलो अलर्ट जारी केला आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक असून चुकून सुद्धा झाडा खाली उभे राहू नये. नदी व नाल्याच्या पुलावरून जर पाणी वाहत असेल तर धाडस करून कुठल्याही प्रकारे पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. नदी, तलाव व धरणे या ठिकाणी नागरिकांनी विशेष: युवकांनी पाण्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हाा नियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Yellow rain alert until Monday; Heavy rain, gale with lightning is forecast in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस