येरे येरे पावसा...

By admin | Published: June 26, 2014 12:47 AM2014-06-26T00:47:43+5:302014-06-26T00:47:43+5:30

ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने उसंत घेतली असली तरी चिंतेचे कारण नाही. कारण विभागातील १६ मोठ्या धरणांमध्ये अद्यापही ४६ टक्के पाणी आहे. त्यामुळे सध्या तरी पाणीपुरवठ्याचा

Yere yere rain ... | येरे येरे पावसा...

येरे येरे पावसा...

Next

नागपूर विभाग : मोठी धरणे ४६ टक्के भरलेली
नागपूर : ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने उसंत घेतली असली तरी चिंतेचे कारण नाही. कारण विभागातील १६ मोठ्या धरणांमध्ये अद्यापही ४६ टक्के पाणी आहे. त्यामुळे सध्या तरी पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत नागपूर विभागातील धरणातच सर्वाधिक पाणीसाठा आहे.
यंदा मान्सूनचे आगमन लांबले, विदर्भात सक्रिय झाल्यावरही तो बरसला नाही. त्यासाठी पुढचे काही दिवस अनुकूल स्थितीही नाही. खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यासह विभागातील मोठ्या धरणांतील जलसाठ्याची स्थिती तपासली असता ती समाधानकारक असल्याचे दिसून येते. विभागात १६ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता २८७१ द.ल.घमी इतकी आहे. २५ जूनपर्यंत त्यात १३१३ द.ल.घ.मी (४६ टक्के) पाणी होते. २०१३ च्या तुलनेत १० टक्के अधिक आहे. मध्यम प्रकल्पाची स्थिती तेवढी समाधानकारक नाही. विभागातील ४० प्र्रकल्पात फक्त १९ टक्केच पाणी साठा असून मागील वर्षाच्या तुलनेत तो ४ टक्यांनी अधिक आहे. ३६६ लघु प्रकल्पात ३९ टक्के पाणीसाठा आहे.
मोठ्या धरणांमध्ये नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्पाचाही समावेश आहे.
सध्या ते निम्मे (४५ टक्के) भरले आहे. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर सध्या तरी संकट येण्याची शक्यता नाही.
कामठी खैरी (नागपूर), बोर (वर्धा), आसोलामेढा (चंद्रपूर) या धरणातही समाधानकारक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. त्यानंत या वर्षी सुरुवातीलाही चांगला पाऊस झाला. त्यामुळे मोठी धरणे भरली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Yere yere rain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.