योग दिनाचे कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:55+5:302021-06-22T04:07:55+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे योग दिनानिमित्त वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यात ...
नागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे योग दिनानिमित्त वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यात आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. योग प्रशिक्षक डॉ. राधिका वझलवार यांनी आयुष योग प्रोटोकॉलनुसार योगासनांची माहिती दिली. सोबत सामूहिक प्रात्यक्षिके करून घेतली. स्वास्थ्यासाठी योग हे या वर्षीचे घोषवाक्य असून, उत्तम आरोग्यासाठी योगासने नियमित करावी. या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर सहभागी झाले होते. जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुरेश मोटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
0-0--0-0-0-0-
मानसरोवर ध्यानयोग व साधना केंद्र
जुने नंदनवन लेआऊट येथील आदिशक्ती त्रि-शताब्दी उद्यान येथील मानसरोवर ध्यानयोग व साधना केंद्राचे योगगुरू सुरेश शर्मा व त्यांचे सहकारी १५ वर्षापासून योग साधना शिकवितात. आज जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भाजपा प्रभाग ३१ (क) तर्फे योग गुरुंचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमाकांत इटकेलवार, मनोज बैस, विनोद रेवतकर, गायत्री शर्मा, सुनिता दुर्गे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेविक शितल कामडे, चंद्रकांत खंगार, अमोल तिडके, जीवन डवले, दत्तात्रय शेवगावकर, अनंत सयाम, राहुल घोडमारे, गीता ईल्लुरकर, वंदना दुरबुडे, सोनाली घोडमारे, संध्या तडस, ममता धुर्वे, प्रतिभा महाकाळकर उपस्थित होते.