मनपात पदाधिकारी व अधिकाऱ्यांची योगसाधना ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:49+5:302021-06-22T04:07:49+5:30
योगदिन उत्साहात : योग हा निरोगी जीवनाचा मंत्र लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने सोमवारी महापालिका ...
योगदिन उत्साहात : योग हा निरोगी जीवनाचा मंत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने सोमवारी महापालिका मुख्यालयात महापालिका व जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी योगसाधना केली. कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता नियमांचे पालन करण्यात आले.
महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, राजेश भगत, रवींद्र भेलावे, मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनापासून बचावासाठी योगासन, प्राणायाम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. योग हा निरोगी जीवनाचा मंत्र आहे. त्याचा प्रत्येकाने अंगिकार करावा, असे आवाहन दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले. राधाकृष्णन बी. यांनीही नगरवासीयांना निरोगी जीवनासाठी योग करण्याचा संदेश दिला. आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी योग हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपल्या घरी, उपलब्ध जागेमध्ये योग करावा. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास लाभ होईल. लहान मुलांपासून ते वयस्कांपर्यंत प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योग करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद तभाने यांनी केले. संचालन पीयूष आंबुलकर तर आभारप्रदर्शन मिलिंद मेश्राम यांनी केले.