तुम्ही आयुष्यच नेताय ‘राँगसाइड’; वाहतूक नियमांबाबत कधी गंभीर होणार नागपूरकर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2023 08:00 AM2023-07-11T08:00:00+5:302023-07-11T08:00:02+5:30

Nagpur News नागपूरकर राँगसाइड वाहन चालवून आपले जीवनच ‘राँग साइड’ घेऊन जात आहेत.

You are leading life 'wrongside'; When will Nagpurkar become serious about traffic rules? | तुम्ही आयुष्यच नेताय ‘राँगसाइड’; वाहतूक नियमांबाबत कधी गंभीर होणार नागपूरकर?

तुम्ही आयुष्यच नेताय ‘राँगसाइड’; वाहतूक नियमांबाबत कधी गंभीर होणार नागपूरकर?

googlenewsNext

कमल शर्मा, मंगेश व्यवहारे, रियाज अहमद

नागपूर : गेल्या पाच महिन्यांत शहरात ४७६ रस्ते अपघात झाले. त्यात १०७ लोकांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागातही परिस्थिती चिंताजनकच आहे. तरीही लोक वाहन चालविताना मनमानीच करतात. वाहतुकीचे नियम तोडणे तर सामान्य बाब झाली आहे. राँगसाइड वाहने चालविणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट व सीटबेल्ट न लावता वाहने चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे याची नागपूरकरांना सवय झाली आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन होतानाच दिसत नाही. नियमांच्या दुर्लक्षामुळेच अपघाताची संख्या वाढत असून, ही बाब शहरासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. त्यासाठी नागपूरकरांनी वाहतूक नियमांबाबत सजग होणे गरजेचे आहे. ‘लोकमत’ने लोकांना वाहतुकीच्या नियमांबाबत जागृत करण्यासाठी पाऊल उचलले आहे. याअंतर्गत राँगसाइडमुळे अपघाताचा धोका यावर प्रकाश टाकला आहे. नागपूरकर राँगसाइड वाहन चालवून आपले जीवनच ‘राँग साइड’ घेऊन जात आहेत.

वाहतूक नियमांबाबत गांभीर्यच नाही : मिलिंद चिटणवीस

वाहतूक नियमांच्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम चालविणारे मिलिंद चिटणवीस म्हणाले की, माणसाचे जीवन अमूल्य आहे. रस्त्यावर वाहने चालवीत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास स्वत:चा व दुसऱ्यांचा जीव वाचविता येऊ शकतो. त्यामुळे चिटणवीस सातत्याने लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करतात; परंतु शोकांतिका आहे की लोकांमध्ये वाहतूक नियमांच्या बाबतीत गांभीर्यच नाही. पोलिस व जागरूक नागरिकांना या दिशेने मोहीम चालविण्याची गरज आहे. जेणेकरून लोकांचे जीव वाचविता येतील व रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लागेल.

Web Title: You are leading life 'wrongside'; When will Nagpurkar become serious about traffic rules?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.