तुम्ही अध्यात्मातच असता, केवळ अहंकारामुळे त्याची जाण नसते : सतीश फडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 11:43 PM2019-08-06T23:43:00+5:302019-08-06T23:45:40+5:30

तुमचे अध्यात्म हे तुमच्यापासून वेगळे नाही आणि त्यासाठी ईश्वरप्राप्ती वगैरे काही नसते. इथेच तुमचा ईश्वर तुम्हाला सापडतो. मात्र, तुम्ही आणि तुमच्या अध्यात्मामध्ये अडथळा निर्माण करणारा तुमचा अहंकार आहे.. असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याता सतीश फडके यांनी केले.

You are only in spirituality, only by ego not consciousness | तुम्ही अध्यात्मातच असता, केवळ अहंकारामुळे त्याची जाण नसते : सतीश फडके

तुम्ही अध्यात्मातच असता, केवळ अहंकारामुळे त्याची जाण नसते : सतीश फडके

Next
ठळक मुद्दे प्रकाश साठे स्मृती व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुमचे अध्यात्म हे तुमच्यापासून वेगळे नाही आणि त्यासाठी ईश्वरप्राप्ती वगैरे काही नसते. इथेच तुमचा ईश्वर तुम्हाला सापडतो. मात्र, तुम्ही आणि तुमच्या अध्यात्मामध्ये अडथळा निर्माण करणारा तुमचा अहंकार आहे.. असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याता सतीश फडके यांनी केले.
स्व. प्रकाश साठे स्मृती व्याख्यानमालेल्या दुसऱ्या दिवशी ‘तुमचे आमचे अध्यात्म’ या विषयावर शैक्षणिक विषयाला हात घालत सतीश फडके यांनी व्याख्यान गुंफले. प्रास्ताविक अमर दामले यांनी केले तर संचालन आसावरी देशपांडे यांनी केले.
डोके कुणाचे कसे चालेल, त्यावर ज्याची त्याची प्रतिक्रिया उमटते. अध्यात्म आणि विज्ञानाच्या बाबतीत, अशी विसंगतीपूर्ण बुद्धी लावली जाते आणि प्रतिक्रिया दिली जाते. मात्र, अध्यात्म ज्याला ईश्वर संबोधते. त्याला विज्ञान ‘ब्रह्मांडीय ऊर्जा’ म्हणते. दोन्ही संकल्पना जीवाला त्याच ऊर्जेचा अंश मानतात, याची जाणीव केवळ अहंकारामुळे स्वत:च स्वत:ला करवून देत नाही. विज्ञानाद्वारे जे अर्जित केले जाते, ते ज्ञान आणि ज्याची अनुभूती होते ते अध्यात्म. दोन्ही पाठमोºया असलेल्या संकल्पना. मात्र, इकडच्याला त्याचा चेहरा आणि तिकडच्याला याचा चेहरा दिसत नाही.. एवढे पातळ अंतर या दोन्ही संकल्पनात असल्याचे सतीश फडके म्हणाले. शेवटी, जे आज कराल त्याचे परिणाम तुम्हाला चांगल्या किंवा वाईट स्वरूपात उद्या प्राप्त होणारच आहेत.. हे सत्य मानले तरच तुम्ही आणि तुमच्या अध्यात्मातील अंतर मिटविता येऊ शकते. यातच ‘तुमच्या आमच्या अध्यात्माचं’ गुपित दडलं असल्याचे फडके म्हणाले. जिथे कुठलीच लपवाछपवी नसते. मला जे वाटले ते वाटले.. हे मान्य करावेच लागेल. मला जे करायचे आहे किंवा केले आहे, तेच सत्य आहे. यापासून पळवाट काढला तर फसाल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: You are only in spirituality, only by ego not consciousness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.