तुम्हालाही झोप येत नाही? निद्रानाशामुळे ४५ टक्के लोकांच्या आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 01:06 PM2022-03-19T13:06:51+5:302022-03-19T13:14:49+5:30

निद्रेसंबंधित(Insomnia) विकारांनी एका वैश्विक महामारीचे रूप घेतले आहे. ज्यामुळे जगातील ४५ टक्के जनसामान्यांना आरोग्यासंबंधित व जगण्याच्या गुणवत्तेला धोका निर्माण झाला आहे,

You can't sleep either? Insomnia threatens the health of 45% of the world's population | तुम्हालाही झोप येत नाही? निद्रानाशामुळे ४५ टक्के लोकांच्या आरोग्याला धोका

तुम्हालाही झोप येत नाही? निद्रानाशामुळे ४५ टक्के लोकांच्या आरोग्याला धोका

googlenewsNext
ठळक मुद्देनिवांत झोपेमुळे मन सशक्त व आनंदी राहते

नागपूर : बरेचसे झोपेचे आजार (Sleep Disorder) हे टाळण्याजोगे अथवा उपचार करण्यासारखे असतात. तरीसुद्धा फक्त एक तृतीयांश पेक्षा कमी रुग्ण तज्ज्ञांची मदत घेतात. निद्रेसंबंधित(Insomnia) विकारांनी एका वैश्विक महामारीचे रूप घेतले आहे. ज्यामुळे जगातील ४५ टक्के जनसामान्यांना आरोग्यासंबंधित व जगण्याच्या गुणवत्तेला धोका निर्माण झाला आहे, असे मत मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे निद्रारोग तज्ज्ञ व श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी व्यक्त केले.

आपण आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश कालावधी झोपेत घालवतो. झोप ही एक मूलभूत मानवी गरज आहे. मुलांमध्ये चयापचय नियमनासाठी व्यायाम आणि पोषणाप्रमाणेच झोप आवश्यक आहे. झोपेचा कालावधी आणि बालपणातील लठ्ठपणा यांच्यातील संबंध असल्याचे पुरावे आहेत. निवांत झोपेमुळे मन सशक्त व आनंदी राहते.

-४ टक्के पुरुषांमध्ये तर २ टक्के महिलांमध्ये ‘स्लीप ॲपनिया’

डॉ. मेश्राम म्हणाले, झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवासाच्या कार्यामध्ये सतत व्यत्यय येण्याला ‘स्लीप ॲपनिया’ म्हणतात. या रोगामुळे ४ टक्के पुरुष आणि २ टक्के स्त्रिया प्रभावित होतात.‘स्लीप ॲपनिया’मुळे दिवसा झोप आणि थकवा येतो आणि त्यामुळे उच्च रक्तदाब, आकस्मिक हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेह यांसारख्या परिस्थिती उद्भवू शकतात मुलांमध्ये, ‘स्लीप ॲपनिया’ हे मस्तिष्क व मानसिक रोगाचे मूळ कारण ठरू शकते.

-लठ्ठपणा, मधुमेह व कर्करोगाला निकृष्ट झोप कारणीभूत

दीर्घकालीन नकृष्ट झोप ही लठ्ठपणा, मधुमेह, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती आणि कर्करोग यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्य समस्यांशी संबंधित आहे. याशिवाय, नैराश्य, चिंता आणि मनोविकृती यासारख्या अनेक मानसिक स्थितींशी संबंधित आहे. चांगले आरोग्य आणि जीवनाची गुणवत्ता राखण्यासाठी गुणवत्तापूर्ण झोप महत्त्वाची असते.

-‘ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप ॲपनिया’

झोपेच्या वेळी वारंवार श्वास बंद होणे हे ‘ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप ॲपनिया’ची लक्षणे आहेत. १० सेकंदांपासून ते एका मिनिटापेक्षा जास्त काळ असू शकतो. यामुळे ऑक्सिजनच्या स्तरांमध्ये घसरण होते. हृदयावर ताण पडतो आणि त्यामुळे अनेक गंभीर परिणाम उद्भवू शकतात भारतात ‘ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप ॲपनिया’ व ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया सिंड्रोम’चे प्रमाण १३.७ टक्के आहे.

-कोरोनाच्या रुग्णांमध्ये निद्रानाशाची तक्रार

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील श्वसनरोग विभागांतर्गत निद्रारोग विभागाने केलेल्या एका अभ्यासात निरोगी लोकसंखेच्या १० टक्केच्या तुलनेत २० टक्के कोरोनाच्या रुग्णांमध्ये निद्रानाशाची तक्रार दिसून आली. एकूणच झोपेच्या खराब गुणवत्तेचा कोरोनाचा तीव्रतेवर महत्त्वपूर्ण परिणाम होत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, अपुऱ्या झोपेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचेही आढळून आले.

:: झोपेसंबंधी महत्त्वाचे

::झोपेशी संबंधित अपघातांमुळे दरवर्षी ७१,००० लोक जखमी तर १,५५५० लोकांचा मृत्यू होतो.

::४६ टक्के लोक हे अपुऱ्या झोपेमुळे काम किंवा कामामध्ये चुका करतात.

::वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे यामुळे झोपेचे विकार, मानसिक आरोग्य विकार आणि लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका कमी करता येतो.

::संतुलित आहार आणि नियमित व्यायामासह चांगली झोप हा उत्तम आरोग्याच्या तीन स्तंभांपैकी एक आहे.

:: निद्रानाश ३० ते ४५ टक्के प्रौढ लोकसंख्येला प्रभावित करतो.

Web Title: You can't sleep either? Insomnia threatens the health of 45% of the world's population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.