परीक्षा केंद्रावर जाऊन द्यावी लागणार पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:11 AM2021-08-14T04:11:04+5:302021-08-14T04:11:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी अनिवार्य असलेल्या पेटचे (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) बहुप्रतीक्षित ...

You have to go to the examination center and give the stomach | परीक्षा केंद्रावर जाऊन द्यावी लागणार पेट

परीक्षा केंद्रावर जाऊन द्यावी लागणार पेट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी अनिवार्य असलेल्या पेटचे (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) बहुप्रतीक्षित वेळापत्रक अखेर घोषित झाले आहे. २८ व २९ ऑगस्ट रोजी पेट घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या परीक्षांत विद्यार्थ्यांना घरबसल्या पेपर सुविधा देण्यात आली होती; परंतु पेटसाठी परीक्षा केंद्रांवर जावे लागणार आहे.

कोरोना व नंतर उन्हाळी परीक्षा यामुळे पेटच्या आयोजनाला फटका बसला. पेटसाठी अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख २४ एप्रिल ही होती. मात्र, कोरोनामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले व विद्यापीठाने १५ मेपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर वेळापत्रक कधी घोषित होते याची उमेदवारांना प्रतीक्षा होती. तीन महिने होत आले असतानादेखील वेळापत्रक जाहीर न झाल्याने अनेकांनी परीक्षा विभागात विचारणादेखील सुरू केली होती. अखेर विद्यापीठाने वेळापत्रक घोषित केले आहे. २८ व २९ ऑगस्ट रोजी विविध टप्प्यांत चारही विद्याशाखांची ऑनलाइन परीक्षा होईल. ही परीक्षा विद्यापीठाने नियोजित केलेल्या परीक्षा केंद्रांवर जाऊनच देता येणार आहे.

‘रिसर्च मेथडॉलॉजी’ आणि ‘अ‍ॅप्टिट्यूड’वर भर

डॉ. आर.जी. भोयर व डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखालील दोन समित्यांनी पीएचडीच्या जाचक अटींमध्ये बदल करीत नवा शिफारशीचा समावेश केला होता. त्यानुसार विद्यापीठाने शिफारशी मान्य केल्या असून, पीएचडीसंदर्भात अधिसूचना काढली. यंदाच्या पेटमध्ये ‘रिसर्च मेथडॉलॉजी’ आणि ‘अ‍ॅप्टिट्यूड’वर भर देण्यात येणार आहे. पहिल्या सेक्शनमध्ये ‘रिसर्च मेथडॉलॉजी’ आणि ‘अ‍ॅप्टिट्यूड’चे प्रश्न असतील, तर दुसऱ्या सेक्शनमध्ये विषयनिहाय प्रश्न राहतील.

६३ विषयांसाठी होणार परीक्षा

विद्यापीठाने चारही विद्याशाखा मिळून एकूण ६३ विषयांसाठी पेट घेण्याचे निश्चित केले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये सर्वाधिक २९ विषयांचा समावेश आहे. मानव्यशास्त्र विद्याशाखेतील २२ विषयांसाठी पेट घेण्यात येईल, तर आंतरशास्त्रीय व वाणिज्य-व्यवस्थापनमधील अनुक्रमे ८ व ४ विषयांसाठी परीक्षा होईल.

...असे आहे वेळापत्रक

दिनांक - वेळ - विद्याशाखा

२८ ऑगस्ट - सकाळी १० ते दुपारी १ - विज्ञान व तंत्रज्ञान

२९ ऑगस्ट - सकाळी १० ते दुपारी १ - वाणिज्य व व्यवस्थापन

२९ ऑगस्ट - सकाळी १० ते दुपारी १- आंतरशास्त्रीय

२९ ऑगस्ट - दुपारी २ ते सायंकाळी ५ - मानव्यशास्त्र

या केंद्रांवर होणार परीक्षा

- सेंट व्हिन्सेंट पलौटी अभियांत्रिकी महाविद्यालय

- शिवाजी विज्ञान महाविद्यालय

- श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय

- जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय

- प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय

- अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालय

- प्रियदर्शिनी इंदीरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय

- के.डी.के. अभियांत्रिकी महाविद्यालय

Web Title: You have to go to the examination center and give the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.