मोठा झालास, आता कामधंदा कर... आई ओरडल्यामुळे युवकाची आत्महत्या
By दयानंद पाईकराव | Updated: July 31, 2023 21:41 IST2023-07-31T21:41:16+5:302023-07-31T21:41:36+5:30
दयानंद पाईकराव, नागपूर : मोठा झाला काहीतरी कामधंदा कर असे आईने म्हटल्यामुळे एका २६ वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या ...

मोठा झालास, आता कामधंदा कर... आई ओरडल्यामुळे युवकाची आत्महत्या
दयानंद पाईकराव, नागपूर : मोठा झाला काहीतरी कामधंदा कर असे आईने म्हटल्यामुळे एका २६ वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ७.४० वाजताच्या सुमारास घडली. अमित गणेश उईके (वय २६, रा. घर नं. ७९८, सोनी सेंटर समोर, मरारटोली) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. अमित बारावी शिकलेला आहे. परंतु तो काहीच कामधंदा करीत नसल्यामुळे त्याची आई सीमा गणेश उईके (वय ५०) यांनी त्याला तु मोठा झाला काहीतरी कामधंदा कर, असे म्हटले. त्याचा अमितला राग आला. त्याने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी सिलींग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. त्याच्या आईने दिलेल्या सूचनेवरून अंबाझरी ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद म्हात्रे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.