"तुम्हीच सांगा, वारांगनांकडून काेण कुरड्या-पापड घेणार?" 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 07:10 AM2021-08-26T07:10:00+5:302021-08-26T07:10:01+5:30

Nagpur News ‘पाेलीस आणि राजकीय पुढारी वारांगनांच्या पुनर्वसनाच्या माेठमाेठ्या बाता करतात. सांगा, काेण पुढाकार घेणार आहे आमच्या पुनर्वसनासाठी, आम्ही तयार केलेल्या वस्तू, कुरड्या-पापड काेण विकत घेणार आहेत? गंगाजमुनातील वारांगनांनी लाेकमत प्रतिनिधीसमाेर केलेल्या या प्रश्नांमधून त्यांची उद्विग्नता जाणवते.

You tell me, who will take kuradya-papad from prostitutes? | "तुम्हीच सांगा, वारांगनांकडून काेण कुरड्या-पापड घेणार?" 

"तुम्हीच सांगा, वारांगनांकडून काेण कुरड्या-पापड घेणार?" 

googlenewsNext
ठळक मुद्देगंगाजमुनातील २००० वारांगनांचे भविष्य अंधारात संघर्षमय आयुष्यांची काळाशी झुंज

अंकिता देशकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘पाेलीस आणि राजकीय पुढारी वारांगनांच्या पुनर्वसनाच्या माेठमाेठ्या बाता करतात. सांगा, काेण पुढाकार घेणार आहे आमच्या पुनर्वसनासाठी, आम्ही तयार केलेल्या वस्तू, कुरड्या-पापड काेण विकत घेणार आहेत, २००० वारांगनांचे पुनर्वसन कुठे करणार आहात ते सांगा?’, गेल्या दहा-बारा दिवसांपासून मुक्त हाेण्यासाठी धडपडणाऱ्या गंगाजमुनातील वारांगनांनी लाेकमत प्रतिनिधीसमाेर केलेल्या या प्रश्नांमधून त्यांची उद्विग्नता जाणवते. (You tell me, who will take kuradya-papad from prostitutes?) (Ganga jamuna issue)

बदनाम, तरीही गजबज राहणाऱ्या इतवारीच्या गंगा जमुना वस्तीत मागील १४ दिवसांपासून वाळवंटाचा शुकशुकाट पसरला आहे. येथे राहणाऱ्या वारांगना आकाशाकडे शुन्यात पाहतांना दिसतात. बाहेर पाेलिसांचा भारी लवाजमा आहे आणि शक्य हाेतील तेवढी बंधने येथे लागली आहेत. केवळ काही महत्त्वपूर्ण हालचालींनीच येथील शांतता भंग पावते. ११ ऑगस्ट राेजी नागपूरचा रेड लाईट एरिया म्हणून ओळख असलेल्या गंगा जमुना सील करण्यात आले आणि अकस्मात येथील २००० वारांगनांचे भविष्य अंधारात सापडले आहे.

येथील एक महिलेने सांगितले, माझ्या मागे तीन मुले आहेत. पाेलिसांचा ताफा येथे फिरत असताे. ग्राहकांना फिरकूही दिले जात नाही. व्यवसाय बंद पडला आहे. मागील १५ दिवसांपासून एक रूपयाही कमावलेला नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाची दाेन वेळची भूक भागविणे कठीण झाले आहे. स्थिती सामान्य हाेईल, असे वाटते पण अधिकाधिक बिकट हाेत चालली आहे. दाेन्ही बाजुची बातचितही बंद पडली आहे. राजकारणी मत घेण्यासाठी येतात, आता मदतीसाठी कुणीही नाही. पुणे आणि सांगलीच्या वारांगनाही या महिलांच्या लढ्यात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे काळाशी सुरू असलेल्या संघर्षाचे यश आता काळच सांगेल.

गंगाजमुना पाडणे हा पर्याय नाही

येथील मीनाक्षी (बदललेले नाव) म्हणाली, गंगा जमुनाला जमिनदाेस्त करणे हा काही पर्याय ठरू शकत नाही. असे झाले तर वारांगना इतर भागात त्यांचा व्यवसाय करतील. इतर महिलांनीही त्यांच्या अस्तित्वाबाबत आवाज उचलला. आतापर्यंत कुणाला समस्या नव्हती आणि अचानक सर्वांना अडचण हाेऊ लागली. त्यांच्या त्यांच्या घरातून बेदखल केले जात आहे.

अल्पवयीन मुलींना राेखण्याची माेहिम

किरण (बदललेले नाव) यांनी सांगितले, येथील वारांगनांनी अल्पवयीन मुलींना या व्यवसायात येण्यापासून राेखण्याची माेहिम राबविली आहे. त्याही पुढे जाऊन, कुणी बळजबरीने लहान मुलींना या व्यवसायात आणले तर थेट पाेलिसांच्या स्वाधीन करण्यास पुढाकार घेतला आहे. मात्र आमच्या प्रामाणिकपणाचेही आता काही माेल राहिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: You tell me, who will take kuradya-papad from prostitutes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.