आरोग्य निरोगी ठेवाल तरच मुकाबला कराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:12+5:302021-06-29T04:07:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोरोना महामारीमध्ये प्रत्येकाने मानसिकरित्या सुदृढ राहणे गरजेचे आहे. आरोग्य निरोगी ठेवाल तरच कोरोनाच्या तिसऱ्या ...

You will fight only if you keep your health healthy | आरोग्य निरोगी ठेवाल तरच मुकाबला कराल

आरोग्य निरोगी ठेवाल तरच मुकाबला कराल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : कोरोना महामारीमध्ये प्रत्येकाने मानसिकरित्या सुदृढ राहणे गरजेचे आहे. आरोग्य निरोगी ठेवाल तरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करू शकाल, असे विचार उमरेड येथे आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळेप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले.

स्थानिक रणधीरसिंह भदोरिया महाविद्यालय व महिला कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी भावनिकदृष्ट्या कसे फिट राहावे आणि जागरुकता कशी निर्माण करावी, या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया, संजय दाणी, प्राचार्य डॉ. श्याम पुंडे, डॉ. जयश्री तिवारी आदींची उपस्थिती होती.

डॉ. अमृता गोखले यांनी, मानवी मानसिकता व विचारसरणी या विषयावर महामारीमध्ये कशाप्रकारे मानसिकदृष्ट्या आनंदी जीवन जगता येईल, यावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. अनिल करवंदे यांनी, आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कसे फिट होऊ शकतो यावर प्रशिक्षण दिले. बालरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष मेश्राम यांनी, लहान मुले व त्यांच्या आरोग्याची काळजी या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. डॉ. प्रग्यासा उपाध्याय यांनी, तणावमुक्त जीवनासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सांगितल्या. डॉ. रिया तिवारी यांनी, मानवी मानसिकता व रोग प्रतिकारशक्ती या विषयावर सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिला.

या ऑनलाईन कार्यशाळेत राज्यभरातून ४०० शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. सरला मेश्राम, डॉ. लखपती गायकवाड, प्रा. उपेंद्र बागुल, प्रा. आरती खेवले, प्रा. सुरेखा जुनघरे, प्रा. प्रमोद मेश्राम, प्रा. आकाश पांडे, प्रा. वर्षा पांडे, तृप्ती दुरुतकर, प्रा. राहुल भुसारी, प्रा. खुशबू घिये, प्रा. रूपाली भिवापूरकर, राजेश खोपे, रजत वैद्य, लक्ष्मण फटिंग, अमित चिंचाळकर आदींनी सहकार्य केले.

Web Title: You will fight only if you keep your health healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.