बावीस नव्हे, बारा महिन्यातच मिळतील संत्र्याची कलमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 11:32 AM2021-07-31T11:32:16+5:302021-07-31T11:33:57+5:30

Nagpur News यापुढे संत्रा, माेसंबीची कलमे अवघ्या १०-१२ महिन्यातच शेतात लागवडीसाठी उपलब्ध हाेणार आहेत. लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेच्या (सीसीआरआय) संशाेधकांनी या तंत्राद्वारे लागवडीलायक लाखाे राेपे तयार करण्यात यश मिळविले आहे.

You will get orange seedlings in twelve months, not twenty-two | बावीस नव्हे, बारा महिन्यातच मिळतील संत्र्याची कलमे

बावीस नव्हे, बारा महिन्यातच मिळतील संत्र्याची कलमे

Next
ठळक मुद्देसीसीआरआयचे संशाेधनडायरेक्ट सीड तंत्रज्ञानाने वाचला वेळ व पैसाही

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संत्रा, माेसंबी या लिंबूवर्गीय फळांची कलमे तयार व्हायला कमीत कमी २२ महिन्यांचा कलावधी लागताे. कर्नाटकी संत्र्याचे कलम तर दाेन वर्षापर्यंतचा कालावधी घेते. मात्र यापुढे संत्रा, माेसंबीची कलमे अवघ्या १०-१२ महिन्यातच शेतात लागवडीसाठी उपलब्ध हाेणार आहेत. लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेच्या (सीसीआरआय) संशाेधकांनी या तंत्राद्वारे लागवडीलायक लाखाे राेपे तयार करण्यात यश मिळविले आहे.

ज्येष्ठ संशाेधक डाॅ. विजयाकुमारी नरूकुल्ला यांनी ‘डायरेक्ट सीडिंग मेथड’ हे तंत्र विकसित केले आहे. सामान्यपणे संत्रा, माेसंबीची लागवडीलायक कलमे तयार व्हायला २२ महिन्यांचा कालावधी लागताे. यामध्ये बीज टाकल्यानंतर ६ ते ७ महिने, प्राथमिक व द्वितीय नर्सरी फेजचे ७ ते ८ महिने आणि बडिंगचा कालावधी ७ ते ८ महिन्यांचा असताे. तेव्हाच ते लागवडीसाठी उपयुक्त ठरते. डाॅ. विजयाकुमारी यांनी गुणवत्तापूर्ण संत्र्याचे बीज सुपीक माती, रेती व शेणखत असलेल्या पाॅलिबॅगमध्ये टाकून राेपे तयार केली आहेत. या तंत्राद्वारे त्यांनी नर्सरीचा कालावधी संपविला आणि बडिंगचा काळही कमी केला आहे. यामुळे लागवडीलायक कलम तयार व्हायला केवळ १२ महिन्यांचा कालावधी लागताे.

लागवडीचा खर्च ५० टक्क्यांनीं  घटला

लागवडीलायक एक कलम तयार व्हायला १२० रुपये लागतात. तंत्राद्वारे नर्सरीचा कालावधी कमी झाल्याने हा खर्च ६० रुपयांवर येताे. म्हणजे कलम तयार करण्याचा कालावधी १० महिन्यांनी घटला आहे. त्यामुळे कलम व लागवडीचा खर्चही ५० टक्क्यांनीं  घटला आहे.

दाेन शेतकऱ्यांनी यशस्वी केला प्रयाेग

नरखेड येथील प्रशांत आणि नांदेडचे शेतकरी संदीप पडलवार यांनी या तंत्राद्वारे कलम लागवडीचा यशस्वी प्रयाेग केला आहे. २ काेटी राेपे तयार करणाऱ्या नांदेडच्या पडलवार यांनी ४० काेटींची बचत केली आहे.

काेणतेही कृषी संशाेधन प्रयाेगशाळेतून शेतापर्यंत पाेहोचले, तेच महत्त्वाचे असते. डायरेक्ट सीड मेथड व मायक्राे बडिंग तंत्र शेतापर्यंत पाेहोचले आणि यशस्वी ठरले, हे आमच्यासाठी समाधान देणारे आहे.

- डाॅ. विजयाकुमारी नरूकुल्ला, संशाेधक, सीसीआरआय

Web Title: You will get orange seedlings in twelve months, not twenty-two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती