सायकलने भारतभ्रमणावर निघाला तरुण शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 12:14 AM2021-02-27T00:14:13+5:302021-02-27T00:16:48+5:30

Young farmer set out on Bharat Bhraman by bicycle काेराेना महामारीच्या काळात सायकलस्वारी हे फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचे साधन ठरले आहे. मात्र औरंगाबादचा एक तरुण शेतकरी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वारसा स्थळांचे संवर्धन करण्याचा संदेश देत सायकलने भारतभ्रमणावर निघाला आहे.

The young farmer set out on a tour of India by bicycle | सायकलने भारतभ्रमणावर निघाला तरुण शेतकरी

सायकलने भारतभ्रमणावर निघाला तरुण शेतकरी

Next
ठळक मुद्दे१५ राज्य, ८० शहरे व ११ हजार किमीचा प्रवास : वारसास्थळे संवर्धनाचा संदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : काेराेना महामारीच्या काळात सायकलस्वारी हे फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचे साधन ठरले आहे. मात्र औरंगाबादचा एक तरुण शेतकरी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वारसा स्थळांचे संवर्धन करण्याचा संदेश देत सायकलने भारतभ्रमणावर निघाला आहे. सुनील थाेरात नामक हा २२ वर्षाचा तरुण सहा राज्यातून ४८५० किलाेमीटरचा प्रवास करून शुक्रवारी रात्री नागपूरला पाेहचला.

सुनील साहेबराव थाेरात हा देवळाणा, जि. औरंगाबाद येथील तरुण गावी जैविक शेती करताे. आयुष्यात एकदा आपला देश फिरावा, हे त्याचे स्वप्न पण कसे हा सवाल. एकदा औरंगाबादजवळच्या वारसा स्थळांना भेट दिली असता, तिथे झालेल्या विद्रुपीकरणाने ताे अस्वस्थ झाला. ऐतिहासिक महत्त्व असलेली ही स्थळे जतन करण्याचा संदेश लाेकांना द्यावा, असा निश्चय त्याने केला. इच्छा तेथे मार्ग म्हणतात ते खाेटे नाही. आपले दाेन्ही स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग त्याला सापडला. २० डिसेंबर राेजी त्याने आपली सायकल उचलली आणि निघाला प्रवासाला. अर्थात घरच्यांचे पाठबळ हाेतेच साेबत पण खिशात केवळ ४५०० रुपये हाेते.

औरंगाबादहून निघाल्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू (काेईंबतूर), केरळ व कन्याकुमारी गाठली. पुढे कर्नाटक, आंध्रप्रदेश हाेत तेलंगणाचा हैदराबाद व आदिलाबादमार्गे सुनील नागपूरला पाेहचला. या प्रवासात त्याने तुळजापूर, विजापूर, बदामी, पट्टडकल, हम्पी, म्हैसूर पॅलेस, केरळचा पश्चिम घाट, इद्दुकी धरण, सबरीमाला मंदिर, तिरुअनंतपुरम, कन्याकुमारी, रामेश्वरम, मदुरै (मीनाक्षी मंदिर), तिरुचिराप्पल्ली, तंजूवरचा शिलालेख, कृष्णगिरी, होसूर, बेंगळुरू तसेच हैदराबादला गोलकोंडा किल्ला, चारमीनार, सालारजंग संग्रहालय, संघी मंदिर, बिर्ला मंदिराला भेट दिली. नागपुरात दाेन दिवस मुक्कामात वारसा स्थळांना भेटी देत ताे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली हाेत मनाली, लेह लद्दाख, कारगीलमार्गे काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात भ्रमण करीत पुन्हा महाराष्ट्र गाठणार आहे. अशाप्रकारे १५ राज्यातील ८० शहरांच्या भारतीय व जागतिक वारसा स्थळांना ताे भेटी देत ११ हजार किलाेमीटरचा प्रवास करणार आहे. असा हा १२० दिवसांचा प्रवास असून पुढल्या ५० दिवसात त्याला ६१५० किलाेमीटरचे अंतर पादाक्रांत करायचे आहे.

माझी ही सायकल राईड भारतीय सैनिकांना व पाेलिसांना समर्पित आहे. वारसा स्थळ जतन करण्यासह आराेग्य आणि पर्यावरण हाही संदेश मला द्यायचा आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली संस्कृती कशी आहे, तिथले लोक कसे आहेत. याचा अभ्यास करायचा होता. ४५०० रुपये घेऊन निघालाे पण प्रवासात लाेकांनी खूप मदत केली.

- सुनील थाेरात, सायकल राईडर

त्या किर्र अंधारात मी एकटा

केरळच्या घाटावरून चालत असताना रात्र झाली हाेती आणि अचानक सायकल पंक्चर झाली. भाषांच्या अडथळ्यात पुढले सुरक्षित ठिकाण गाठायचे हाेते. त्या किर्र अंधारात मी सायकल ढकलत चालत हाेताे. अशावेळी त्या मार्गे जाणाऱ्या वन विभाग व पाेलीस कर्मचाऱ्यांनी मदत केली. हैदराबादमध्ये असाच एकाने समाेर येऊन गळा दाबला हाेता. हे काही कटू प्रसंग आहेत पण बरेच चांगले अनुभव आहेत.

Web Title: The young farmer set out on a tour of India by bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.