कुटुंबीयांसमोरच 'त्या' दोघांनी घेतली विहिरीत उडी; प्रेमकहाणीचा करुण अंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 10:38 AM2022-03-29T10:38:29+5:302022-03-29T10:42:53+5:30

महेश गुराखी हाेता, तर तन्वी बेला येथील तिडके हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकायची. दाेघेही दाेन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात हाेते. ते शुक्रवारी कुणालाही न सांगता घरून निघून गेले हाेते.

young man and a teenage girl committed suicide by jumping into a well in front of their families | कुटुंबीयांसमोरच 'त्या' दोघांनी घेतली विहिरीत उडी; प्रेमकहाणीचा करुण अंत!

कुटुंबीयांसमोरच 'त्या' दोघांनी घेतली विहिरीत उडी; प्रेमकहाणीचा करुण अंत!

googlenewsNext
ठळक मुद्देबेला परिसरातील घटना

बेला (नागपूर) : आपल्या प्रेमाला घरची मंडळी समजू शकणार नाही, म्हणत त्यांनी घरातून पळ काढला. घरून निघून गेलेल्या तरुण व अल्पवयीन मुलीचा त्यांचे कुटुंबीय शाेध घेत असतानाच दाेघेही राेडने जात असल्याचे कुटुंबीयांना दिसले. त्यातच दाेघांनी कुटुंबीयांसमाेर शेतातील विहिरीच्या दिशेने धाव घेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दाेघांचीही आपसात चांगली ओळखी असून, ते शुक्रवार (दि. २५) पासून बेपत्ता हाेते.

महेश शालिक ठाकरे (वय २६) व तन्वी विठ्ठल चुटे (१६, दाेघेही रा. बेला, ता. उमरेड) अशी मृतांची नावे आहेत. महेश गुराखी हाेता, तर तन्वी बेला येथील तिडके हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकायची. दाेघेही दाेन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात हाेते. ते शुक्रवारी कुणालाही न सांगता घरून निघून गेले हाेते. ही बाब लक्षात येताच दाेघांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घ्यायला सुरुवात केली.

महेशच्या कुटुंबीयांनी साेमवारी त्याचा शाेध बेलापासून तीन कि.मी.वर असलेल्या कुर्ला (ता. समुद्रपूर) शिवारात घेतला. दाेघेही त्यांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राेडने जात असल्याचे दिसले. कुटुंबीयांना पाहताच दाेघांनी धावत जाऊन कुर्ला शिवारातील अक्षय जनार्दन कांबळे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. त्यामुळे महेशच्या कुटुंबीयांनी तन्वीच्या कुटुंबीयांना व बेला पाेलिसांना माहिती दिली. समुद्रपूर पाेलिसांनी सायंकाळी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी समुद्रपूर पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.

अपहरणाच्या गुन्ह्याची नाेंद

दाेघांचेही शाेधकार्य सुरू असताना तन्वी महेशसाेबत निघून गेल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली हाेती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी महेशच्या विराेधात त्याने तन्वीचे अपहरण केल्याची तक्रार नाेंदविली हाेती. त्या तक्रारीच्या आधारे बेला पाेलिसांनी महेश ठाकरे यांच्या विराेधात भादंवि ३६३ अन्वये गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली हाेती.

Read in English

Web Title: young man and a teenage girl committed suicide by jumping into a well in front of their families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.