विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:12+5:302021-06-09T04:11:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : विषारी औषध प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्यांतर्गतच्या कुंभारी शिवारात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : विषारी औषध प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्यांतर्गतच्या कुंभारी शिवारात रविवारी (दि.६) दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
अविनाश विजय लाेखंडे (२२, रा. इतवारी पेठ, उमरेड) असे मृत तरुणाचे नाव असून, ताे उमरेड येथील एका दुकानात माेटरसायकल दुरुस्तीचे काम करीत हाेता. काेराेना लाॅकडाऊनमुळे दुकान बऱ्याच दिवसापासून बंद असल्याने ताे घरीच राहत हाेता. कमावता अविनाश काेराेनामुळे अचानक बेराेजगार झाल्याने निराश व हताश हाेता, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान, रविवारी सकाळी ६ वाजता अविनाश आणि त्याची दुचाकी घरी दिसली नाही. काही वेळानंतर त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. अशातच दुपारच्या सुमारास कुंभारी शिवारातील शेतात अविनाशचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. शेतात अविनाश मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात नाईक पाेलीस भाेजराज झाडे करीत आहेत.