गळफास लावून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:14+5:302021-09-02T04:18:14+5:30

कामठी : अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास लावून एका विवाहित तरुणाने आत्महत्या केली. ही घटना कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या ...

Young man commits suicide by hanging | गळफास लावून तरुणाची आत्महत्या

गळफास लावून तरुणाची आत्महत्या

Next

कामठी : अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास लावून एका विवाहित तरुणाने आत्महत्या केली. ही घटना कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील येरखेडा येथे मंगळवारी (दि. ३१) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

राेशन कृष्णाजी चकाेले (२६, रा. गादा, ता. कामठी, हल्ली मु. येरखेडा, कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे. राेशनचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला हाेता. ताे पत्नीसह कामठीतील येरखेडा येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास हाेता. दरम्यान, मंगळवारी घरी कुणीही नसताना त्याने नायलाॅन दाेरीच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे. राेशनच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, आईवडील, भाऊ असा आप्तपरिवार आहे.

Web Title: Young man commits suicide by hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.