ट्रकचालकाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:14 AM2021-08-17T04:14:03+5:302021-08-17T04:14:03+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : वजन करण्यासाठी ट्रक काट्यावर उभा केल्यानंतर खाली उतरताना तरुणाचा ताेल गेला व खाली पडल्याने ...

Young man dies due to truck driver's negligence | ट्रकचालकाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू

ट्रकचालकाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : वजन करण्यासाठी ट्रक काट्यावर उभा केल्यानंतर खाली उतरताना तरुणाचा ताेल गेला व खाली पडल्याने त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. ट्रकचालकाने त्याला उपचाराला नेणे अथवा दुसऱ्याला सांगण्याऐवजी तिथून पळ काढला. ही बाब काही तासांनी उघड हाेताच त्याला उपचाराला नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) वीज केंद्राच्या आवारात रविवारी (दि. १५) रात्री घडली.

मोरेश्वर मारोती बन्सोड (३२, रा. भानेगाव, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. माेरेश्वर व रवींद्र अजाबराव सरोदे दाेघेही एकाच गावचे रहिवासी व मित्र हाेते. त्यांनी एमएच-४०/बीजी-०७३३ क्रमांकाच्या ट्रकने वेकाेलिच्या शिंगाेरी (ता. पारशिवनी) खाणीतून खापरखेडा वीज केंद्रात काेळसा आणला हाेता. रवींद्रने वजन करण्यासाठी ट्रक काट्यावर उभा केला. त्यावेळी केबिनमधून उतरताना माेरेश्वरचा ताेल गेला व ताे खाली पडला.

ही बाब लक्षात येताच ट्रकचालकाने त्याला जखमी अवस्थेत बाजूला केले व ट्रक घेऊन निघून गेला. काही वेळाने याच काट्यावर दुसरा ट्रक वजन करण्यासाठी आला असता, ट्रकचालकास माेरेश्वर पडला असल्याचे दिसले. त्याने याबाबत सुरक्षा रक्षक प्रमाेद नवले यांना माहिती दिली. माेरेश्वरवर चिचाेली (खापरखेडा) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे साेमवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कनिष्ठ सुरक्षा अधिकारी दीपक नांद्रे यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. वृत्त लिहिस्ताे खापरखेडा पाेलिसांनी गुन्ह्याची नाेंद केली नव्हती.

...

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

वीज केंद्राच्या आवारात प्रवेश करावयाचा असल्याच परवानगी घ्यावी लागते. वीज केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, नियमित व कंत्राटी कामगारांनाही विनागेटपास आत जाण्याची परवानगी दिली जात नाही. हाच नियम ट्रकचालकांसह इतरांनाही लागू आहे. माेरेश्वर रवींद्रसाेबत त्याच्या ट्रकच्या केबिनमध्ये बसून आत गेला. त्याच्याकडे गेटपास नसताना ताे आत गेला कसा, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असून, सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Young man dies due to truck driver's negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.