तरुणाचा डोहात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:39 AM2021-02-05T04:39:57+5:302021-02-05T04:39:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : मित्रांसाेबत फिरायला आलेला तरुण नदीच्या पात्रात पाेहायला उतरला आणि अनवधानाने डाेहातील खाेल पाण्यात बुडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : मित्रांसाेबत फिरायला आलेला तरुण नदीच्या पात्रात पाेहायला उतरला आणि अनवधानाने डाेहातील खाेल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेगरा येथील पेंच नदीपात्रात मंगळवारी (दि. २६) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
सागर हरिकिसन गिरी (वय २३, रा. बैलगाव, जि. नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. घाेगरा (ता. पारशिवनी) हे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असल्याने सागर त्याच्या काही मित्रांसाेबत येथे फिरायला आला हाेता. या सर्वांनी परिसर फिरल्यानंतर ते देवस्थान परिसरात फिरायले गेले. नंतर ते पाण्यात पाेहायला उतरले. साेबतच सागरही उतरला. पाेहताना सागर खाेल पाण्यात गेला. नंतर त्याला परत येणे कठीण झाल्याने ताे पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. अशात ताे खाेल पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती पारशिवनी पाेलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पाेलीस उपनिरीक्षक ज्ञानाेबा पळनाटे यांनी घटनास्थळ गाठून मासेमाऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
आठवड्यातील दुसरी घटना
रविवारी (दि. २४) घाेगरा परिसरातील एका डाेहात १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. पाेलिसांनी घटनेची दखल घेत नदीपात्राच्या परिसरात बॅरिकेट्स लावले हाेते. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी त्या परिसरात कुणीही गेले नाही. परंतु नदीपात्रात इतर ठिकाणी डाेहसदृश स्थिती निर्माण झाली असून, ही दुर्दैवी घटना घडली. पर्यटकांनी श्रीक्षेत्र घाेगरा सभाेवतालच्या परिसरात फिरावे. अंघाेळ व पाेहण्यासाठी खाेल पाण्यात उतरू नये, असे आवाहन केले आहे.