चाकूहल्ल्यात तरुण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:10 AM2021-03-31T04:10:01+5:302021-03-31T04:10:01+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : दारू कुठे मिळते, याबाबत माहिती न दिल्याने चिडलेल्या चाैघांनी तरुणास मारहाण करायला सुरुवात केली. ...

Young seriously injured in knife attack | चाकूहल्ल्यात तरुण गंभीर जखमी

चाकूहल्ल्यात तरुण गंभीर जखमी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : दारू कुठे मिळते, याबाबत माहिती न दिल्याने चिडलेल्या चाैघांनी तरुणास मारहाण करायला सुरुवात केली. त्यातच एकाने त्याच्या पाेटावर चाकूने वार केल्याने ताे गंभीर जखमी झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री येथे रविवारी (दि. २८) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

विशाल रामबली चव्हाण (२०, शिवनगर, रा. कांद्री, ता. पारशिवनी) असे जखमी तरुणाचे तर फ्रँक ॲन्थाेनी (३५, रा. हनुमाननगर, कांद्री, ता. पारशिवनी), अजय चव्हाण, रॉयल चाफले दाेघेही रा. कांद्री व सुरेंद्र कुलदीप, रा. अशोकनगर, कन्हान, ता. पारशिवनी अशी आराेपींची नावे आहेत. हाेळी असल्याने विशाल त्याच्या घरासमाेर उभा हाेता. त्याचवेळी फ्रँक, अजय व सुरेंद्र त्याच्याजवळ आले. त्यांनी विशालला दारू कुठे मिळते, याबाबत विचारणा केली. त्यावर आपल्याला माहीत नाही, असे उत्तर विशालने देताच तिघांनीही त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली.

त्याचवेळी राॅयल तिथे आला आणि चाैघांनीही विशालला धक्काबुक्की करीत मारहाण केली. ही मारहाण सुरू असतानाच अजयने विशालच्या पाेटावर चाकूने वार केले. ताे जखमी हाेताच चाैघांनीही तिथून पळ काढला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. विशालला कन्हान येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर येथील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी नंदकिशाेर सहानी (१९, रा. कांद्री, ता. पारशिवनी) याची तक्रार व विशालच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे कन्हान पाेलिसांनी चारही आराेपींविरुद्ध भादंवि ३०७, २९४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक शेख करीत आहेत. वृत्त लिहिस्ताे आराेपींना अटक करण्यात आली नव्हती.

Web Title: Young seriously injured in knife attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.