गळफास लावून तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:07 AM2021-03-22T04:07:52+5:302021-03-22T04:07:52+5:30
सावनेर : अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास लावून तरुणीने आत्महत्या केली. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी येथे ...
सावनेर : अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास लावून तरुणीने आत्महत्या केली. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी येथे शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
माेनाली रामकृष्ण कुमरे (२०, रा. किल्लापुरा वाॅर्ड क्र. १, पाटणसावंगी, ता. सावनेर) असे मृत तरुणीचे नाव आहे. घरी कुणीही नसताना माेनालीने घराच्या लाकडी फाट्याला नायलाॅन दाेरीच्या साहाय्याने गळफास लावला. दरम्यान, तिची आई घरी आल्यानंतर तिने आरडाओरड करताच शेजारी मदतीला धावून आले. लागलीच तिला खाली उतरवून पाटणसावंगी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर तिला नागपूर येथील मेयाे हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान माेनालीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस हवालदार नागरे करीत आहेत.