उमरेड येथील तरुणीचा डेंग्यूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:08 AM2021-07-27T04:08:47+5:302021-07-27T04:08:47+5:30
उमरेड : उमरेड येथे मागील काही दिवसापासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी येथील एका तरुणीचा डेंग्यूने मृत्यू झाला. ...
उमरेड : उमरेड येथे मागील काही दिवसापासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी येथील एका तरुणीचा डेंग्यूने मृत्यू झाला. काजल कालिदास शंभरकर (२३, ड्रीम सिटी, उमरेड) असे या तरुणीचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून काजलला ताप होता. अशातच तिला उमरेड येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांनतर काजलची डेंग्यूची चाचणी करण्यात आली. यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर काजलला नागपूरच्या एका खाजगी दवाखान्यात औषधोपचार करण्यात आले. प्रकृती बरी वाटत असतानाच रविवारी पुन्हा तिची प्रकृती बिघडली. रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. काजल बीएससीची पदव्युत्तर होती. अभ्यासात अतिशय हुशार आणि तल्लख असलेली काजल शिकवणी वर्ग सुद्धा घेत असे. काजलचे वडील कालिदास शंभरकर हे उमरेड तालुक्यातील खेरीबुटी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. काजलच्या अशा अचानक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.