इमारतीवरून पडून तरुण कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:31+5:302021-02-05T04:37:31+5:30

कामठी : निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुण कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जुनी कामठी ...

Young worker dies after falling from building | इमारतीवरून पडून तरुण कामगाराचा मृत्यू

इमारतीवरून पडून तरुण कामगाराचा मृत्यू

Next

कामठी : निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुण कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जुनी कामठी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेंढा येथे साेमवारी (दि. १) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

रिजवान अहमद जमील अहमद (३०, रा. न्यू येरखेडा, कामठी) असे मृत कामगाराचे नाव आहे. माेंढा परिसरात मनाेज यादव यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर रिजवान अहमद हा लाकडी सेंट्रिंग बांधण्याचे काम करीत असताना अचानक पाय स्लिप हाेऊन ताे खाली काेसळला. त्यात रिजवानला गंभीररीत्या दुखापत झाली. लागलीच त्याला कामठी येथील खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मंगळवारी सकाळच्या सुमारास रिजवानचा मृत्यू झाला. या प्रकरणी जुनी कामठी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस हवालदार दिलीप ढगे करीत आहेत.

Web Title: Young worker dies after falling from building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.