युवा पिढीला गांधी विचारधारेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:56+5:302021-07-14T04:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : अलीकडे युवा पिढी दिशाहीन होत आहे. अशावेळी खऱ्या अर्थाने युवा पिढीला महात्मा गांधींच्या विचारधारेची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : अलीकडे युवा पिढी दिशाहीन होत आहे. अशावेळी खऱ्या अर्थाने युवा पिढीला महात्मा गांधींच्या विचारधारेची गरज आहे. विचार अभिव्यक्त करणे आणि ते आत्मसात करणे यात बरीच तफावत आहे. गांधीजींचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री डॉ. श्रा. गो. पराते यांनी केले.
उमरेड येथील जीवन विकास वनिता विद्यालयात आयोजित वा. डो. बाकडे लिखित ‘स्पंदन’ या पुस्तकाच्या विमाेचन कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी आमदार राजू पारवे, लोकमत दिल्लीचे संपादक विकास झाडे, जीवन शिक्षण मंडळाचे संस्थापक वा. डो. बाकडे यांची मंचावर उपस्थिती होती. प्रारंभी संगीत शिक्षक अरुण बोढे यांनी स्वागतपर गीत सादर केले. स्पंदन पुस्तक उमरेडसाठी ही बाब गौरवास्पद आहे. तरुणांना प्रेरित करणारे विचार या पुस्तकात मांडल्या गेले असल्याची बाब आ. राजू पारवे यांनी मांडली.
‘स्पंदन’च्या माध्यमातून विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक पैलूंची उकल केल्या गेली असल्याचे मत विकास झाडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश झुरमुरे यांनी केले. आभार राजेश वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका विभा भुसारी, विवेक विघ्ने, प्रकाश वारे, बंडू शिंदे, अरविंद बाकडे आदींची उपस्थिती होती. देवराव बाकडे, प्रशांत सपाटे, मयूर झाडे, आनंद पुनवटकर आदींनी सहकार्य केले.