नागपुरात वीज बिल माफीसाठीआपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:39 PM2020-06-03T23:39:36+5:302020-06-03T23:41:05+5:30
कोरोनामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले गेले आहे. अनेकांचे आर्थिक मिळकतीचे स्रोतच बंद झाले आहेत. अशास्थितीत वीज बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शासनाने राज्यातील वीज ग्राहकांचे २०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले गेले आहे. अनेकांचे आर्थिक मिळकतीचे स्रोतच बंद झाले आहेत. अशास्थितीत वीज बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शासनाने राज्यातील वीज ग्राहकांचे २०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली. यासाठी बुधवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन पुढेही चालविण्यावर भर राहणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. अशास्थितीत वीज बिल भरणे नागरिकांसाठी शक्य नाही. महाविकास आघाडीच्या शासनाने जनतेचा विचार करून २०० युनिटपर्यंतची वीज बिले माफ केली पाहिजे. कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांच्या लॉकडाऊन काळातील विजेची बिले माफ झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी भूमिका ‘आप’ने या निवेदनातून मांडली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वीज मंत्री नितीन राऊत यांना ई-मेलने निवेदन पाठविण्यात आले. नागपूर जिल्ह्यात काटोल, पारशिवनी, रामटेक व हिंगणा येथील तहसीलदारांनादेखील निवेदन देण्यात आले.