आपली बसचा करार २१९ दिवसांनी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:11 AM2021-09-07T04:11:38+5:302021-09-07T04:11:38+5:30
नुकसानभरपाईला परिवहन विभागाचा नकार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘आपली बस’ कोरोनाच्या पहिल्या लाटेत २१९ दिवस ठप्प होती. करारानुसार ...
नुकसानभरपाईला परिवहन विभागाचा नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आपली बस’ कोरोनाच्या पहिल्या लाटेत २१९ दिवस ठप्प होती. करारानुसार यादरम्यानची ४५ टक्के नुकसानभरपाई देण्याची मागणी तीन बस ऑपरेटरांनी केली आहे. परंतु परिवहन विभागाने नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. परंतु कराराचा कालावधी २१९ दिवसांनी वाढविण्याला सहमती दर्शविली आहे. बुधवारी मनपा सभागृहात हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
कोरोना संक्रमणामुळे २३ मार्च २०२० ला राज्यासह संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या कालावधीत सर्व व्यवहार व बस सेवा ठप्प होती. त्यानंतर २८ ऑक्टोबर २०२० पासून काही बसेस सुरू करण्यात आल्या. करारानुसार ऑपरेटरांनी नुकसानभरपाई मागितली आहे. परिवहन विभागाने ती नाकारली आहे. तसेच कंडक्टर उपलब्ध करणाऱ्या मे. युनिटी सिक्युरिटी फोर्स यांना मुदतवाढ देण्याचा प्रश्न समिती सदस्य वैशाली रोहनकर, रूपाली ठाकूर यांनी उपस्थित केला. परिवहन समितीने हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. तो सभागृहात ठेवला जाणार आहे.
...
सत्तापक्ष प्रशासनाला धारेवर धरणार
सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्या तक्रारीवरून सत्तापक्ष प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे. सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून व प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. तसेही प्रश्नोत्तराच्या तासातील १० प्रश्नांपैकी ७ प्रश्न सत्तापक्षाच्या नगरसेवकांनी दिले आहेत.