‘आपली बस’ थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:32 AM2017-09-03T01:32:04+5:302017-09-03T01:32:28+5:30
‘आपली बस’च्या कंडक्टरने (वाहक) बसमध्ये गैरवर्तन केल्याची पत्नीची तक्रार ऐकताच संतापलेल्या धंतोली ठाण्याच्या पोलीस कर्मचाºयाने संबंधित बसवाहकाला जबर मारहाण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आपली बस’च्या कंडक्टरने (वाहक) बसमध्ये गैरवर्तन केल्याची पत्नीची तक्रार ऐकताच संतापलेल्या धंतोली ठाण्याच्या पोलीस कर्मचाºयाने संबंधित बसवाहकाला जबर मारहाण केली. मात्र वाहकाने कुठलाही गैरप्रकार केला नाही, गर्दीमुळे चुकीने हा प्रकार झाला. कुठलीही चौकशी न करता मारहाण करण्यात आली, असा पवित्रा घेत संतापलेल्या बसवाहकांनी धंतोली पोलीस स्टेशनसमोर गोंधळ घातला. पोलिसांनी वाहकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे बसवाहकांमध्ये असंतोष पसरला असून शनिवारी दुपारपासून त्यांनी कामबंद करीत ‘आपली बस’ची चाके थांबविली आहेत.
छेडखानीचा आरोप असलेल्या वाहकाचे नाव अशोक वालुरकर (४५) असून त्याला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुटीबोरीकडून सीताबर्डीकडे येणाºया आपली बसमधून संबंधित महिला प्रवास करीत होती. दुपारी २ वाजताच्या सुमारास बस धीरन कन्या शाळेसमोरील बुटीबोरी पॉर्इंटवर पोहचताच महिलेने धंतोली ठाण्यात कार्यरत असलेला महिलेने पतीला फोन केला व प्रवासादरम्यान बसवाहक अशोक वालुरकरने आपल्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार केली. माहिती मिळताच पोलीस कर्मचाºयाने लागलीच बुटीबोरी पॉर्इंटवर जाऊन वाहक वालुरकर यांना मारहाण केली व पोलीस स्टेशनमध्ये आणले. हा प्रकार पाहून बसवाहकांमध्ये
असंतोष पसरला. पोलीस कर्मचाºयाने चौकशी न करता गुन्हा दाखल करण्याआधीच वाहकाला मारहाण केल्याचा आरोप बस कर्मचाºयांनी केला. वाहकांच्या मते बुटीबोरी बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अशावेळी तिकीट काढताना कंडक्टरचा प्रवाशांना धक्का लागणे शक्य असते. असे असताना महिलेने नाहक तक्रार केली असल्याचा आक्षेप वाहकांनी घेतला. त्यामुळे सीताबर्डीपासून धंतोली स्टेशनपर्यंत मारहाण करीत नेल्याने संतापलेल्या वाहकांनी काम बंद करून धंतोली ठाण्यावर मोर्चा वळविला. वाहक अशोक वालुरकर यांना सोडून संबंधित पोलिसावर कारवाई करण्याची मागणी करीत बसवाहकांनी नारेबाजी केली. त्यामुळे धंतोली भागात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. पोलीस कर्मचाºयावर कारवाईची मागणी करीत वाहक ठाण्यासमोरच धरण्यावर बसले. स्थिती लक्षात घेता परिमंडळाचे डीसीपी राकेश ओला धंतोली ठाण्यात पोहचले. त्यांनी वाहक प्रतिनिधी व कामगार नेते बंडू तळवेकर यांच्याशी चर्चा करून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी वाहक अशोक वालुरकर यांच्यावर महिलेशी गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल करीत अटक केली .
वाहक संपावर
पोलिसाकडून मारहाण व त्यानंतर वाहकाविरोधात अटकेची कारवाई केल्याने बसवाहकांनी काम बंद केले. त्यामुळे दुपारपासून आपली बस थांबली होती. कर्मचारी संघटनेने सायंकाळी बैठक घेउन संपाचा इशारा दिला. अशोक वालुरकर यांचा जामीन घेऊन मारहाण करणाºया पोलीस कर्मचाºयावर कारवाईची मागणी करण्यात येईल. पोलिसावर कारवाई होईपर्यंत कामावर परतणार नाही, असा इशारा संघटनेच्या प्रतिनिधीने दिला.
प्रवाशांचे हाल
शनिवारी दुपारपासून अचानक आपली बसची चाके थांबल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. बुटीबोरी, कामठी, डिफेंस, हिंगणा आदी भागात जाणाºया प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. बस बंद झाल्याचे समजताच काहींनी आॅटोचा पर्याय निवडला. मात्र बसवर अवलंबून असलेल्यांना हाल सहन करावे लागले. आॅटोचा पर्याय निवडणाºयांनाही वेळेवर आॅटो मिळत नसल्याने ताटकळावे लागले. त्यामुळे सीताबर्डी परिसरात प्रवाशांचा गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून येत होते.