नागपुरात आपली बस ठप्प; विद्यार्थी व प्रवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 02:29 PM2018-08-10T14:29:38+5:302018-08-10T14:31:44+5:30
नागपूर महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीचा फटका आपली बसला बसला आहे. गेल्या तीन महिन्यापासून बस आॅपरेटरचे ४२ कोटी थकीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीचा फटका आपली बसला बसला आहे. गेल्या तीन महिन्यापासून बस आॅपरेटरचे ४२ कोटी थकीत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन व डिझेलसाठी किमात २१ कोटी द्यावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रत्येकी एक कोटी असे तीन कोटी आॅपरेटरच्या खात्यात जमा केले. या रकमेतून कर्मचाऱ्यांचे वेतन देता येईल. परंतु डिझेल भरणे शक्य नसल्याने रेड बस आॅपरेटरने शुक्रवारी अघोषित संप पुकारल्याने २५० बसेस ठप्प होत्या. महापालिका प्रशासन व बस आॅपरेटर यांच्या वादात विद्यार्थी व प्रवाशांना मात्र हकनाक त्रास सहन करावा लागत आहे.
आॅपरेटला दर महिन्याला महापालिकेकडून घेणे असलेली रक्कम वेळेवर मिळत नाही. एप्रिल महिन्यापासून त्यांना बील मिळालेले नाही. वारंवार मागणी करूनही बील मिळत नसल्याने आॅपरेटरने संपावर जाण्याचा निर्णय घेतला. शहर बस रस्त्यांवर धावणार नसल्याची विद्यार्थी व नोकरदार यांना कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे ते सकाळी विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी निघाले परंतु बस बंद असल्याने त्यांनी जाता आले नाही. बस बधून प्रवासी करणारे कर्मचारी सकाळी कार्यालयात जाण्यासाठी निघाले. परंतु बसेस बंद असल्याने त्यांना आॅटो वा खासगी वाहनांनी जावे लागले. यामुळे अनेकांना वेळेवर कार्यालयात पोहचता आले आहे.