‘डीडीसीए’तील भ्रष्टाचाराविरूध्द आपची निदर्शने
By Admin | Published: December 27, 2015 03:33 AM2015-12-27T03:33:11+5:302015-12-27T03:33:11+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘डीडीसीए’चे अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम आदमी पार्टीने व्हेरायटी चौकात निदर्शने केली.
अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी
ंनागपूर : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘डीडीसीए’चे अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम आदमी पार्टीने व्हेरायटी चौकात निदर्शने केली. क्रिकेटमध्ये फोफावलेल्या भ्रष्टाचाराला नष्ट करण्यासाठी देशव्यापी आंदोलन करून अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली. स्टेडियम तयार करण्यासाठी २४ कोटींचा खर्च सांगून १२४ कोटी रुपये कंपन्यांना वाटण्याचे काम अरुण जेटली अँड कंपनीने आपल्या कार्यकाळात केले. देशातील नामवंत खेळाडू किर्ती आझाद, बिशनसिंग बेदी यांनी त्यांना वारंवार सूचना देऊनही जेटली यांनी भ्रष्टाचाराच्या कमाईचा रेकॉर्ड केला. त्यांची १२० कोटींची संपत्ती पाचपट वाढल्याचा आरोप करण्यात आला. भ्रष्टाचाराबाबत दिल्ली सरकारला सांगितल्यानंतर हा घोटाळा पुढे आला. दिल्ली सरकार कारवाई करीत असताना सीबीआने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात छापा मारून त्यांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. खासदार किर्ती आझाद यांनी घोटाळा पुढे आणल्यामुळे निलंबित करण्यात आले. आम आदमी पार्टीने आंदोलनात अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी देवेंद्र वानखेडे, जगजीत सिंग, अशोक मिश्रा, कविता सिंघल, संजय अनासाने, करण शाहू, वंदना मेश्राम, अंबरीश सावरकर आदी उपस्थित होते.