युवक काँग्रेसने साजरा केला ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:08 AM2021-09-18T04:08:42+5:302021-09-18T04:08:42+5:30
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसतर्फे ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ साजरा करून पंतप्रधानांना आंदोलनरूपी भेट ...
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसतर्फे ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ साजरा करून पंतप्रधानांना आंदोलनरूपी भेट दिली. शहरात विविध ठिकाणी आंदोलन करीत बेरोजगार युवकांनी पकोडे तळले. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पाळले गेले नाही, यावर नाराजी व्यक्त करण्यात आली.
जिंजर माॅल, जरीपटका परिसरात प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात प्रदेश महासचिव अजित सिंग, सचिव आसिफ शेख यांच्यासह युवकांनी बेरोजगार रॅली काढून पकोडे तळले. रोजगारनिर्मितीच्या बाबतीत मोदी सरकार अपयशी ठरले आहे. बेरोजगारी वाढण्यास केंद्रातील भाजप सरकारची आर्थिक धोरणे कारणीभूत आहेत. सुशिक्षित तरुणांनी पकोडे तळावेत, चहाच्या टपऱ्या चालवाव्यात, बूट पॉलिश करावी, अशी भाजपची इच्छा असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका करीत ‘बहुत हुई मन की बात, अब करो रोजगार की बात’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. रत्नाकर जयपूरकर, ठाकूर जग्यासी, सुरेश जग्यासी, सुरेश पाटील, मूलचंद मेहर, दिनेश यादव, नेहा निकोसे, सतीश पाली आंदोलनात आदींनी भाग घेतला.
युवक काँग्रेसचे महासचिव सचिन करिहार व सचिव सदेले यांच्या नेतृत्त्वात महायज्ञ करून सरकारला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना करण्यात आली. आंदोलनात दिलीप खैरवार, आलोक कोंडापुरवार, बंटी खरे, सिमरन डकाह, विशाल वाघमारे, सिमरन गौतम, राज सलतापे, अश्विन करिहार आदींनी भाग घेतला.
प्रदेश युवक कॉंग्रेस सचिव अक्षय हेटे यांच्या नेतृत्त्वात चहा विकून, पान टपरी, गॉगल बेल्ट विकून बेरोजगार दिन साजरा करण्यात आला. आंदोलनात गिरीश पांडव, दिनेश तराळे, संदीप देशपांडे, अफजल शहा, सुहास नानवटकर आदींनी भाग घेतला.