पाण्यासाठी युवक काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:43 AM2017-10-26T01:43:47+5:302017-10-26T01:43:58+5:30

उत्तर नागपुरातील पाणी टंचाईबद्दल युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तर नागपुरातील पॉवर ग्रीड चौकातून ओसीडब्ल्यूच्या कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढून ओसीडब्ल्यू कार्यालयासमोर निदर्शने केली.

Youth Congress Front for Water | पाण्यासाठी युवक काँग्रेसचा मोर्चा

पाण्यासाठी युवक काँग्रेसचा मोर्चा

Next
ठळक मुद्देनागरिक संतापले : पाणी समस्या त्वरित निकाली काढण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर नागपुरातील पाणी टंचाईबद्दल युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तर नागपुरातील पॉवर ग्रीड चौकातून ओसीडब्ल्यूच्या कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढून ओसीडब्ल्यू कार्यालयासमोर निदर्शने केली.
पाणी टंचाईमुळे संतापलेल्या नागरिकांनी नगरसेविका नेहा निकोसे, युवक कॉंग्रेसचे महासचिव राकेश निकोसे, नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात अनियमित पाणीपुरवठा, दूषित पाणी, वाढीव बिल, वेळेवर टँकर पोहोचत नसल्याबद्दल ओसीडब्ल्यू कार्यालयावर हल्लाबोल केला. नागरिकांनी जोरदार नारेबाजी करून आपल्या समस्यांकडे ओसीडब्ल्यूच्या अधिकाºयांचे लक्ष वेधले. महिलांनी आपल्या जवळील पाण्याचे मडके फोडून संताप व्यक्त केला. ओसीडब्ल्यूच्या अधिकाºयांनी पोलिसांना पाचारण केले. बंटी शेळके यांनी पाण्याची भीषण समस्या सोडविण्यासाठी त्वरित उपाययोजना न केल्यास अधिकाºयांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला. नगरसेवक कमलेश चौधरी यांनी वाढीव पाणी बिलामुळे नागरिक त्रस्त झाले असल्याचे सांगितले. एम्प्रेस मॉलवर १७ कोटी रुपयांची थकबाकी असून त्या मॉलची पाण्याची जोडणी न तोडता गरीब नागरिकांची नळजोडणी तोडण्यात येत असल्याबद्दल यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. शहरातील पाणी समस्या त्वरित निकाली काढण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात नगरसेवक बंटी शेळके, नगरसेवक कमलेश चौधरी, नगरसेविका नेहा निकोसे, दिनेश यादव, युवक कॉंग्रेसचे महासचिव राकेश निकोसे, प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव कुणाल राऊत, महिला प्रदेश सचिव शिल्पा बोडखे, महिला युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष व्हिक्टोरीया फ्रान्सिस, राजेंद्र ठाकरे, अमीर नुरी, अजित सिंह, सतीश पाली उपस्थित होते.

Web Title: Youth Congress Front for Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.