ब्लँकेट दूत -उपराजधानीत रात्रभर जागून फेडताहेत समाजऋण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 01:04 PM2019-12-10T13:04:42+5:302019-12-10T13:05:08+5:30

गेल्या सहा वर्षांपासून डॉ आशिष अटलोए व त्यांचे सहकारी शहरात निशुल्क ब्लँकेट वितरण करीत आहेत.

Youth distributes Blankets at midnight in Nagpur | ब्लँकेट दूत -उपराजधानीत रात्रभर जागून फेडताहेत समाजऋण

ब्लँकेट दूत -उपराजधानीत रात्रभर जागून फेडताहेत समाजऋण

Next
ठळक मुद्देनिराधारांना देत आहेत मायेचे पांघरूण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, डिव्हाडरवर, मंदिराच्या आश्रयाने, बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर आदी अनेक सार्वजनिक ठिकाणी गरीब, निराधार, वंचित मंडळी थंडीमुळे कुडकुडत झोपलेली असतात.. अशा निराधारांसाठी कित्येक जण विचार करतात परंतु कृती मात्र करणारे दुर्मिळच असतात. अशात थेट कृती करून एका युवकाने ब्लँकेटदूत म्हणून नागपूरकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आशिष अटलोए असे त्या होतकरू तरुणाचे नाव आहे. गेल्या सहा वर्षांपासून डॉ आशिष अटलोए व त्यांचे सहकारी कैलास कुथे, निलेश नागोलकर, शीलदेव दोडके, अशोक गाडेकर, चंद्रकांत चोथे सुशील मौर्य, जयराज मार्कंड, गुंजन रठ्ठे शहरात निशुल्क ब्लँकेट वितरण करीत आहेत.
अशी करतात मदत...
डॉ. आशिष अटलोए आणि त्यांचे सहकारी मागील सहा वर्षांपासून रस्त्यावर कोणी थंडीत कुडकुडत दिसल्यास त्याबाबत कळविण्याचे आव्हान व्हॉटस्पच्या माध्यमातून करीत आहेत. दररोज त्यांना थंडीत कुणीतरी झोपून असल्याचे 17 -18 मेसेज येतात निरोप मिळताच ही मंडळी तेथे जाऊन गरजूला ब्लँकेट देतात. रस्त्यावर झोपलेली व्यक्ती बहूधा उपाशी पण असते त्यामुळे आपल्या सोबत ब्रेड, बिस्कीट पण ठेवतात रात्री 11 ते 1 पर्यंत ब्लँकेट वितरित करतात.
ज्यांना कोणाला या उपक्रमांमध्ये मदत करायची असेल किंवा ब्लँकेट द्यायचे असेल त्यांनी डॉ.आशिष अटलोए 9922765678 या क्रमांकावर संपर्क साधावा.
अशीही सामाजिक बांधिलकी....
केवळ हिवाळ्यात ब्लँकेट वितरणाचे कामच नाही तर उन्हाळ्यात गरीब, निराधार, अनवाणी पायांसाठी ते चप्पल दूत होतात, याशिवाय पावसाळ्यात छत्र्या ,गरीबांच्या घरांसाठी ताडपत्री , पक्षांना पाणी मिळावे म्हणून कुंड्यांचे वितरण करण्याचे काम ते करीत असतात. स्वातंत्र्य संग्राम सैनिक असलेले आजोबा गौरीशंकर अटलोए यांच्याकडून मिळालेला वारसा ते अभिमानाने चालवत आहेत.

भिकाऱ्यांना रोजगारासाठी राबविणार उपक्रम....
रोजगार मिळवून स्वाभिमानाने जगण्याची इच्छा बाळगणाऱ्या निराधार भिकाऱ्यांसाठी उपक्रम राबविण्याचा निर्धार डॉ.आशिष अटलोए यांनी केला आहे. छत्र हरवलेले निराधार, वंचित, गरीब रोजगाराची इच्छा बाळगणाऱ्या भिकाऱ्यांना वजन काटा देणे, मंदिरासमोर फुले तेल किंवा आवश्यक साहित्यांची दुकाने लावून देण्यास मदत करणार असल्याचे सांगितले

Web Title: Youth distributes Blankets at midnight in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.