युथ एम्पॉवरमेंट समिट : पहिल्याच दिवशी ९ हजार लोकांच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 09:22 PM2020-02-14T21:22:15+5:302020-02-14T21:24:24+5:30
युथ एम्पॉवरमेंट समिटच्या पहिल्याच दिवशी ९ हजार तरुण-तरुणींच्या मुलाखती पार पडल्या. यातून ७७६ जणांची विविध कंपन्यांसाठी निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युथ एम्पॉवरमेंट समिटच्या पहिल्याच दिवशी ९ हजार तरुण-तरुणींच्या मुलाखती पार पडल्या. यातून ७७६ जणांची विविध कंपन्यांसाठी निवड करण्यात आली आहे.
फॉर्च्यून फाऊंडेशन, सूक्ष्म लघु व मध्यम विकास संस्था, इंजिनिअरींग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार निवास परिसरात सहावे युथ एम्पॉवरमेंट समिट आयोजित करण्यात आले आहे. या समिटसाठी एक दिवसापूर्वीपर्यंत १५ हजार लोकांनी नोंदणी केली होती. यात शुक्रवारी पुन्हा ९ हजार लोकांची भर पडली. अशी एकूण २४ हजार लोकांनी आतापर्यंत ऑनलाईन नोंदणी केली आहे. अहेरी एटापल्लीपासून लोकांनी नोंदणी केली. यात दहाबी-बारावी ते उच्च विद्याविभूषितांचा समावेश आहे.
शुक्रवारपासून सुरु झालेला हा रोजगार मेळावा तीन दिवस चालणार आहे. आज पहिल्या दिवशी जवळपास १५ हजारांवर लोकांची याला भेट दिली. यात ९ हजार लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शनिवारी व रविवारी ऑनलाईन नोंदणी वाढेल. आमदार निवासाच्या १०० खोल्यांमध्ये या मुलाखती घेतल्या जात आहेत. ५० पेक्षा जास्त कंपन्यांचे अधिकारी मुलाखती घेताहेत.
विविध बँका व माहितीचे स्टॉल
या रोजगार मेळाव्यात विविध बँका व रोजगारासंबंधी माहिती देणारे स्टॉलही लावण्यात आले आहेत. नोकरीसह स्वयंरोजगार करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती येथे उपलब्ध करून दिली जात आहे.