नागपुरात युवकाचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:36 PM2018-08-22T22:36:22+5:302018-08-22T22:38:38+5:30

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रॉपर्टी डिलरने एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. जखमी युवकाने यशोधरानगर आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या चकरा मारल्या. दरम्यान गुन्हेगारांच्या माध्यमातून प्रॉपर्टी डिलरने युवकाला धमकावल्याने जखमी युवक तक्रार न करताच परत गेला.

A youth kidnapped in Nagpur | नागपुरात युवकाचे अपहरण करून मारहाण

नागपुरात युवकाचे अपहरण करून मारहाण

Next
ठळक मुद्देधमकी मिळाल्याने तक्रार करण्यास जखमीचा नकार : पाचपावलीत प्रॉपर्टी डिलरची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रॉपर्टी डिलरने एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. जखमी युवकाने यशोधरानगर आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या चकरा मारल्या. दरम्यान गुन्हेगारांच्या माध्यमातून प्रॉपर्टी डिलरने युवकाला धमकावल्याने जखमी युवक तक्रार न करताच परत गेला.
पीडित ३५ वर्षीय युवकाचे नाव सुनील आहे. तो प्लॉटचे मोजमाप करण्याचे काम करतो. सूत्रानुसार सुनीलचा प्रॉपर्टी डीलरसोबत पैशावरून वाद सुरू होता. सुनील मंगळवारी दुपारी नारा-नारी येथील एका प्लॉटची मोजणी करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी प्रॉपर्टी डिलर आपल्या साथीदारासह चार चाकी वाहनाने तिथे पोहोचला. त्याने सुनीलला मारहाण केली. तसेच बळजबरीने त्याला गाडीत बसवून आपल्या कार्यालयात नेले. कार्यालयात त्याला बंधक बनवून बेदम मारहाण केली. दरम्यान संधी मिळताच सुनीलने आपल्या पत्नीला फोन करून घटनेची माहिती दिली. असे सांगितले जाते की, सुनीलच्या पत्नीने नियंत्रण कक्षाला फोन करून सूचना दिली. परंतु घटनास्थळ माहिती नसल्याने ती व्यवस्थित माहिती देऊ शकली नाही. पोलिसांपर्यंत माहिती गेल्याची माहिती होताच प्रॉपर्टी डिलर व त्याचे गुन्हेगार साथीदारांनी सुनीलला मुक्त केले. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सुनील पत्नीसह यशोधरानगर पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्याने घटनेची माहिती दिली. यशोधरानगर पोलिसांनी त्याला पाचपावली पोलीस ठाण्यात पाठवले. सायंकाळी ५ वाजता तो पत्नीसह पाचपावली ठाण्यात गेला. त्याचवेळी प्रॉपर्टी डिलरही आपल्या साथीदारासह ठाण्यात पोहोचला. त्यांनी गुन्हेगार साथीदार व आपल्या भरवशाच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुनीलवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. आपल्या मदतीसाठी त्याने काही नेत्यांनाही बोलावून घेतले होते. प्रॉपर्टी डिलरची एकूण ताकद पाहता सुनीलने तक्रार न करणे येग्य समजले आणि तो घरी परत गेला. या घटनेने सुनील व त्याचे कुटुंबीय दहशतीत आहेत.

पोलिसांवर केला होता हल्ला
या प्रकरणातील प्रॉपर्टी डिलरने आठ वर्षांपूर्वी गुन्हे शाखेतील पोलीस दलावर हल्ला केला होता. तो अनेक दिवसांपासून जुगार अड्ड्याशी जुळलेला आहे. २००८ मध्ये गुन्हे शाखेने पाचपावली पोलीस ठाण्याद्वारे संचालित जुगार अड्ड्यावर धाड टाकून त्याला पकडले होते. त्यामुळे संतापून त्याने पोलिसांवरच हल्ला केला होता.

 

Web Title: A youth kidnapped in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.