तरुणाची हत्या
By admin | Published: July 29, 2014 12:47 AM2014-07-29T00:47:32+5:302014-07-29T00:47:32+5:30
उमरेड मार्गावरील विहीरगावातील एका टपरीत रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. रोशन सुरेश भुरे (वय १९) असे मृताचे नाव आहे.
टपरीत मृतदेह : पाच आरोपी ताब्यात
नागपूर : उमरेड मार्गावरील विहीरगावातील एका टपरीत रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. रोशन सुरेश भुरे (वय १९) असे मृताचे नाव आहे. तो भांडे प्लॉट माकडे ले-आऊट (उमरेड रोड) येथे राहात होता. त्याच्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचे चौकशीत उघड झाले. रोशनचे वडील कारपेंटर आहेत. त्याला रेशमा (वय २०) नामक बहीण आहे. आयटीआय केल्यानंतर रोशनने शिक्षण सोडून दिले होते. मनात आले तेव्हा तो काम करायचा अन्यथा मित्रांसोबत फिरत राहायचा.
पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात मित्रांसोबत फिरत असताना अश्विन भास्कर कावळे याच्या दुचाकीला रोशनचा कट लागल्यावरून त्यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी मित्रांनी ते सोडवले. मात्र, आरोपी अश्विनच्या मनात खुन्नस होती. त्याने रोशनचा काटा काढण्याचे ठरवले. तो संधीची वाट बघत होता. रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अश्विनला रोशन दिसला. त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने रोशनला नंदनवनमधील डिलक्स बारमध्ये बोलवून घेतले. दारू प्यायला मिळते म्हणून रोशनही गेला. बारमध्ये अश्विन, माविक निवृत्ती महाजन, अक्षय उमेश राऊत, सक्षम प्रकाश मासूरकर आणि प्रदीप सुरेश वारजूरकर (सर्व रा. ओमनगर सक्करदरा) बसून होते.
रोशनच्या देहाची चाळण
आरोपींनी रोशनच्या देहाची अक्षरश: चाळण केली. त्याच्या शरीरावर एकूण ५६ घाव आहेत. त्यामुळे बराच वेळेपर्यंत त्याच्या मृतदेहाची ओळखच पटली नाही. दुपारनंतर तो रोशनचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपींची शोधाशोध सुरू झाली. एकेक करीत पाचही आरोपींची नावे आणि पत्ता पोलिसांना कळला. त्यानंतर पाचही जणांना सायंकाळी हुडकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले.